रिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी

Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 25, 2024, 02:52 PM IST
रिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी title=

Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने (Ricky Ponting) क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या ऑल टाइम ग्रेट क्रिकेटर्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पॉण्टिंगने भारताच्या महान खेळाडूचा समावेश केला आहे. भारताच्या या महान खेळाडूचं नाव आहे सचिन तेंडुलकर. क्रिकेट कारकिर्दीत सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉण्टिंगमध्ये नेहमीच चुरशीची लढत होती. सर्वोत्तम क्रिकेटपटू सिद्ध करण्याची शर्यत या दोघांमध्ये असायची.

पॉण्टिंगची ऑलटाईम बेस्ट Playing XI
रिकी पॉण्टिंगने निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आपापला काळ गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅथ्यू हेडनला (Matthew Hayden) बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीला पसंती देण्यात आली आहे. तर हेनचा जोडीदार म्हणऊन ऑस्ट्रेलियाच्याच जस्टिन लँगरची (Justin Langer) निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम ऑलराऊंडर जॅक कॅलिसला (Jacques Kallis) तिसऱ्या क्रमांकवर पसंती देण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. फलंदाजीचा चौथा क्रमांक सचिन तेंडुलकरचा नेहमीच खास राहिला आहे.

कर्णधार म्हणून या खेळाडूला पसंती
रिकी पॉण्टिंगने पाचव्या क्रमांकावर वेस्टइंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला (Brian Lara) निवडलं आहे. तर सहाव्या क्रमांकावर श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराला (Kumar Sangakkara)  पसंती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिकी पॉण्टिंगने निवडलेल्या सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनचं कर्णधारपदही कुमार संगकाराकडे सोपवण्यात आलं आहे. 

पॉण्टिंगच्या संघात विकेटकिपर
रिकी पॉण्टिंगने सातव्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी आणि विकेटकिपिंगसाठी महेंद्र सिंग धोनीऐवजी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज-विकेटकिपर एडम गिलख्रिस्टवर (Adam Gilchrist) विश्वास दाखवल आहे. पॉण्टिंगच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजांची धुरा पाकिस्तानचा वसीम अक्रम (Wasim Akram), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदजा कर्टली एम्ब्रोस (Curtly Ambrose) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शेन वॉर्न (Shane Warne) हा संघाताली एकमेव फिरकी गोलंदाज आहे. 

रिकी पॉण्टिंगची सर्वोत्तम  Playing XI:
मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, जॅक कॅलिस, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, कुमार संगकारा (कर्णधार), एडम गिलक्रिस्ट (विकेटकीपर), शेन वॉर्न, कर्टली एंब्रोस, वसीम अकरम आणि ग्लेन मॅक्ग्रा