Union budget 2025: जेव्हा तुम्ही एखादी नवीन कार खरेदी करतात तेव्हा तुम्हाला एक नव्हे तर अनेक प्रकारच्या Tax भरावे लागतात. इतकंच नव्हे तर तुमच्याकडून कित्येक प्रकारची फीदेखील आकारली जाते. यबाबत बरेचसे ग्राहक अनभिज्ञ असतात. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगणार आहोत. कार खरेदी करताना अप्रत्यक्षपणे किती टॅक्स द्यावा लागतो.
एक्स शोरुम किंमतः उत्पादक कंपनीकडून डीलरकडे पोहोचल्यावर कारकडून आकारली जाणारी ही किंमत आहे. यामध्ये वाहतूक खर्च आणि डीलर कमिशनचा समावेश असतो.
रोड टॅक्सः हा कर राज्य सरकारकडून आकारण्यात येतो आणि प्रत्येक राज्यांकडून वेग- वेगवेगळा असतो.
रजिस्ट्रेशन शुल्कः हा कर देखील राज्य सरकारकडून आकारण्यात येतो आणि हे शुल्क कारचे प्रकार आणि त्याच्या इंजिनची क्षमतेनुसार वेगवेगळा कर आकारण्यात येतो.
मोटर वाहन टॅक्सः हा करदेखील राज्य सरकारकडून आकारण्यात येतो आणि कार आणि इंजिनच्या क्षमतेनुसार वेगवेगळा असतो.
जीएसटीः केंद्र सरकारकडून हा कर लावला जातो आणि हा कारची एक्स शोरुम किंमत आणि अन्य शुल्कांवर लावला जातो. हा कर 18 टक्के किंवा 28 टक्के असू शकतो. तो कार कोणती आहे त्यावर अवलंबून असतो.
अतिरिक्त शुल्कः काही राज्य सरकार किंवा महानगरपालिका अतिरिक्त शुल्कदेखील लागू करु शकतात. जसं की, पार्किंग शुल्क किंवा पर्यावरण शुल्क
हे सर्व कर आणि शुल्क मिळून एका नव्या कारची ऑन रोज किंमत, एक्स शोरुम किंमतीपेक्षा खूप अधिक होऊ शकते. कर आणि शुल्क वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आकारण्यात येते.
समजा तुम्ही 15 लाख रुपयांची एक कार खरेदी करत आहात तर तुम्हाला GST आणि SES च्या रुपात 5.20 लाख रुपये सरकारला द्यावे लागतील. इतकंच नव्हे तर, कार तुम्ही 1 लाख किलोमीटर चालवताय तर पेट्रोलवर जवळपास तुम्हाला 7.50 लाख रुपये भरावे लागणार आहेत. आता समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की एवढ्या इंधनासाठी तुम्हाला 10.75 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवावे लागेल कारण तुम्हाला 3.25 लाख रुपये आयकर भरावा लागेल. इंधनावर व्हॅट आणि अबकारी कर देखील आकारला जाईल, ज्यापैकी 58 टक्के सरकारला जाईल. तर या परिस्थितीत, जर तुम्ही 2 रुपयांची गाडी खरेदी करत असाल, तर तुम्हाला एकूण 1 रुपये 16 पैसे सरकारला द्यावे लागतील.