IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. सामन्यादरम्यान, भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात शिवम दुबेला चेंडूने हेल्मेटवर आदळल्यानंतर, वेगवान गोलंदाज हर्षित राणाला कंसशन पर्याय म्हणून समाविष्ट करण्यात आले. डावाच्या शेवटच्या षटकात जेमी ओव्हरटनच्या पाचव्या चेंडूवर हेल्मेटवर आदळला. जेव्हा अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी हर्षित राणासारख्या तज्ञ वेगवान गोलंदाजाला इंग्लंडच्या डावाच्या १२व्या षटकात गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले त्यावेळी सामन्यात निर्णायक वळण आले.
हर्षित राणाने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेत विरुद्ध टीमला नाकीनऊ आणले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अर्धवेळ गोलंदाजी करणारा अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा या स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाचा कंसशन पर्याय म्हणून कसा वापर करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित करत संतप्त झाला. या घटनेमुळे इंग्लंडचा चौथा T-20 सामना केवळ 15 धावांनी गमावला नाही तर मालिकाही गमावली. मॅचनंतर सोशल मीडियावर आणि इंग्लंड टीम कॅम्पमधून टीम इंडियावर 'बेईमानी'चे आरोप केले जात आहेत.
हे ही वाचा: राखी सावंतला प्रेमात पुन्हा धोका! पाकिस्तानचा 'होणारा नवरा' आता म्हणतो- 'मला ही...'
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर रागाने म्हणाला, "हा समान कंसशन सब्स्टीट्यूट पर्याय नव्हता. हे आम्हाला मान्य नाही." इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाची नाराज होत म्हणाला, "एकतर शिवम दुबेने त्याच्या गोलंदाजीचा वेग सुमारे 25 mph ने वाढवला आहे किंवा हर्षित राणाने त्याच्या फलंदाजीत खरोखरच चांगली सुधारणा केली आहे. हा खेळाचा भाग आहे आणि आम्ही खरोखरच सामना जिंकायला हवा होता, आम्ही निर्णयाशी असहमत आहोत."