टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र ....

India VS Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची शनिवारी घोषणा करण्यात आली. आयसीसी इव्हेंट म्हटलं की उत्सुकतता असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. 

पुजा पवार | Updated: Jan 18, 2025, 05:10 PM IST
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र .... title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद हे पाकिस्तानकडे असून यंदा बहुतेक सामने हे पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये खेळवले जातील. तर टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन सामने खेळणार नसल्याने त्यांचे सामने हायब्रीड मॉडेल पद्धतीने दुबईत खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची (Team India) शनिवारी घोषणा करण्यात आली. आयसीसी इव्हेंट म्हटलं की उत्सुकतता असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील याविषयी जाणून घेऊयात.   

भारतीय संघात कोणाचा समावेश? 

चॅम्पियन्स ट्रॉफी करता टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्मा तर उपकर्णधारपद हे शुभमन गिलकडे असणार आहे. 15 सदस्यांच्या संघात मिडल ऑर्डर फलंदाज म्हणून विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल , वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ऑल राउंडर फलंदाज म्हणून हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली. तर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आहेत. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह यांची निवड झालीये तर फिरकीची बाजू कुलदीप यादव, जडेजा आणि अक्षर पटेल पाहतील. 

कधी होणार भारत - पाकिस्तान सामना? 

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये भारत ग्रुप ए चा भाग असून यात न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. टीम इंडिया तीन ग्रुप स्टेज सामने खेळेल. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा दुसरा सामना हा भारत- पाकिस्तान यांच्यात होईल. 23 फेब्रुवारी रोजी हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय खेळवला जाईल.  50 ओव्हरचा हा सामना दुपारी 2 : 30 वाजता सुरु होईल. 

दुबई मैदानाचा इतिहास भारतासाठी टेन्शन वाढवणारा : 

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास पहिला तर आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये पाच सामने झाले असून यातील सर्वाधिक ३ सामने पाकिस्तानने जिंकले तर २ सामने हे भारताने जिंकले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा इतिहास पाहिला तर 2021 साली याच मैदानावर पाकिस्तानने भारताविरुद्ध 10 विकेट्सने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना जिंकला होता. या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल होते. तेव्हा जवळपास दोन वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडिया याच मैदानावर पाकिस्तानशी भिडणार आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारत हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

हेही वाचा : टीम इंडियाच्या Champions Trophy संघात स्टार खेळाडूंचं कमबॅक, मात्र चिंतेचं एकमेव कारण...

टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने कधी? 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा