Champions Trophy 2025 :19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 18 जानेवारी रोजी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाची घोषणा केली. जवळपास ८ वर्षांनी आयोजित करण्यात आलेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. मात्र अशात टीम इंडियासाठी चिंतेचं एकमेव कारण समोर आलं आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात समावेश करण्यात आलेला आहे. मात्र असं असलं तरी बुमराहच्या फिटनेसबाबत अजूनही शंका आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. सध्या बुमराहवर बंगळुरूमध्ये एनसीएमध्ये उपचार सुरु असून त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जात आहे. पत्रकार परिषदेत सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी सांगितले की "बुमराहच्या फिटनेसबाबत अजूनही शंका आहे. म्हणूनच आम्ही अर्शदीप सिंह याला संघात निवडलंय. कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुरुवातीच्या सामन्यांना बुमराह प्लेईंग ११ चा भाग नसेल". जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये एकूण 32 विकेट्स घेतले. बुमराह सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे बुमराहची दुखापत ही भारतीय संघासाठी चिंतेची बाबत ठरली आहे.
Rohit Sharma said, "we're not sure of Jasprit Bumrah at this stage, so we wanted someone who can take up that role, we picked Arshdeep Singh". pic.twitter.com/u5PpLKIlmE
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) January 18, 2025
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापत ग्रस्त असल्याने मोहम्मद शमी हा जवळपास 14 महिने टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्याला पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलंय. मोहम्मद शमीला 22 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी देखील टीम इंडियाचं भाग बनवण्यात आलंय.
हेही वाचा : ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी : रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान
2 मार्च : रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड
रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा