Mohammed Siraj and Zaina Bhosle's Video : भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराज हा काल 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरु असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या टीमचा तो भाग नाही. अशात मोहम्मद सिराज काय करतोय हे त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळते. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून सगळ्यांना मोहम्मद सिराजची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे.
सिराज हा लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेसोबत दिसला. त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघं जनाईच्या नव्या म्यूजिक एल्बमचं गाणं 'कहेंदी है' चं एक कडव गाताना दिसले. त्यानंतर जनाईनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्याचे दिसले. हा व्हिडीओ शेअर करत जनाईनं कॅप्शन दिलं की त्या व्यक्तीसाठी जो आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न पूर्ण करण्याचं कारण ठरला. जगात तू सगळ्यात बेस्ट आहेस! चॅम्पियन ट्रॉफीआधी सिराजनं पवित्र शहर मक्काची यात्रा आणि उमराह केला. सिराजनं त्याच्या या याचेत्रा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जनाईनं देखील या पोस्टवर तीन हार्ट इमोजीसोबत रिअॅक्ट केलं आहे.
सिराजला इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या व्हाइट-बॉल सीरिजसाठी देखील निवडण्यात आलं नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नॉन-ट्रॅव्हलिंग सब्स्टिट्यूटच्या रूपात सहभागी झाला. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं चॅम्पियन्स ट्रॉफी टीममध्ये पेस बॉलिंग बॅकअपच्या कमीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की 'जसप्रीत बुमराहच्या फिटनेसला घेऊन अनिश्चिततेत टीममध्ये सहभागी करण्यात येऊ शकतं. त्यांनी म्हटलं की अशात त्यांना बॅकअप पेसरची गरज आहे. सिराज एक उत्तम पर्याय आहेय दुबईईमध्ये चार स्पिनर्ससोबत खेळणं व्यवहारिक नाही. बुमराह आणि शामी या दोघांना दुखापत झाली आहे. त्यामुळे लगेच त्यांना खेळता येणं शक्य नाही असं वाटतंय. सिराजसारखा पेसर त्यांची कमी भरून काढू शकतो.'
हेही वाचा : Chhaava Box Office Collection : बजेट कधीच मागे पडलं; विकी कौशलच्या छावानं सहाव्या दिवशी केली 'इतकी' कमाई
दरम्यान, या आधी जनाई आणि सिराजचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांचे हे फोटो जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. तर दुसरीकडे या अफवा पाहता सिराज आणि जनाईनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचे सांगितले.