Mahabharat Unknown Facts : महाभारत याबद्दल आजही अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीय. ज्यांनी महाभारत वाचलं त्यांनाही अनेक प्रश्न आजही पडतात. महाभारतातील असा एका एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की, वनवासात पांडव्याकडे एक चमत्कारी भांड होतं. पाडंव जेव्हा 12 वर्ष वनवासात होते तेव्हा सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे अन्नाची. जंगलात पोटभरण्यासाठी अन्न कसं मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्यात जेव्हा ऋषी आणि इतर पाहुणे त्याच्याकडे आले तेव्हा त्यांना अन्न देणे कठीण झालं होतं. अशा स्थितीत युधिष्ठिरांना एक चमत्कारिक भांड मिळलं होतंय. ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता जाणवली नाही. या चमत्कारिक भांड्याला काय म्हणतात? वनवासानंतर त्या भांड्याच काय झालं? या चमत्कारी भांड्याचा वापरासाठी काही अटी होत्या, ज्यामुळे तो एकदा मोठ्या अडचणीत ते सापडले होते.
पांडवांकडे एक चमत्कारी भांड होतं त्याला अक्षय पात्र असं म्हटल्याचा इतिहासात उल्लेख होता. या अक्षय पात्राबद्दल एक आख्यायिका आहे. असं नाही की जेव्हा पांडव वनवासात गेले तेव्हा त्यांच्याजवळ अक्षय पात्र होतं. तर जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा त्यांना अनेक वेळा उपाशीपोटी झोपावे लागले. तर कधी पुरेसे अन्न मिळाले नाहीत.
पांडवाकडे येणाऱ्या शेकडो ऋषींचा आदरातिथ्य करण्यात ते कधी कमी पडले नाहीत. त्यांना तृप्त होईपर्यंत भोजन पांडवांनी दिले. जंगलात युधिष्ठिर यांना एवढं अन्न कसं मिळालं, याबद्दल तुम्हालाही प्रश्न पडला असेलच ना.
वनवासात असताना पांडवांच्या झोपडीत पाहुणे आणि ऋषीमुनी येत होते. अशावेळी त्यांच्या आदरातिथ्यमध्ये कमी पडू नये याची चिंता द्रौपदीला होती. द्रौपदीने युधिष्ठिरला या समस्येचे निरासन करण्यास सांगितलं. त्यावेळी युधिष्ठिर नदीकाठी गेला आणि पाण्यात उभे राहून त्यांनी सूर्यदेवाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. अनेक दिवस असे करत राहिल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि प्रकट झाले. त्यांनी युधिष्ठिरांना या तपश्चर्येबद्दल विचारलं, तेव्हा संकोचून युधिष्ठिराने त्याला संपूर्ण समस्या सांगितली.
या समस्येवर सूर्यदेवाने युधिष्ठिरला सांगितलं की, आता वनवासात त्याला फक्त स्वतःच्या अन्नाचीच काळजी करावी लागणार नाही तर तो त्याच्याकडे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना दैवी भोजनही देता येणार आहे. असे सांगून त्यांनी युधिष्ठिराला एक चमत्कारी भांड दिले. जे होतं अक्षय पात्र. खरं तर पौराणिक कथेत अशी नोंद आहे की, धौम्या नावाच्या एका कौटुंबिक पुजाऱ्याने युधिष्ठिरला या संदर्भात सूर्याची उपासना करण्याच सांगितलं होतं.
सूर्यदेवाने एक अट घातली, ते म्हणाले की, जोपर्यंत द्रौपदी तिचं जेवण पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पात्र दररोज आणि प्रत्येक तासाला अमर्याद प्रमाणात अन्न पुरवत राहील. या भांड्यातून त्यांना धान्य, फळे, भाजीपाला इत्यादी चार प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील.
अक्षय पात्रासंदर्भात अजून एक आख्यायिका अशी पण आहे, की वनवासात एके दिवशी पांडव आणि द्रौपदी यांनी जेवण केल्यानंतर दुर्वासा ऋषी पांडवांना भेटायला आले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक शिष्यही होते. आल्यावर त्यांनी जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली. द्रौपदी काळजीत पडली. दरम्यान, दुर्वासाने अचानक सांगितलं की, तो आणि त्याचे शिष्य नदीत स्नान करून येत आहेत. मग आपण जेवण करणार.
चिंतेत पडलेल्या द्रौपतीने श्रीकृष्णाकडे हाक मारली. बहिणीच्या हाक ऐकताच कृष्ण प्रकट झाले. कृष्णाने बहिणीला अक्षय पात्र आणण्यास सांगितलं. त्यात तांदळाचा एक दाणा शिल्लक होता आणि तो कृष्णाने खाल्ला. यानंतर तो म्हणाला की या तांदळाच्या दाण्याने त्याचे पोट आधीच भरले आहे. आता द्रौपदी, काळजी करू नकोस. दुर्वासा आणि त्याचे शिष्य येणार नाहीत. तसेच घडले. दुर्वासा आणि सोबतचे लोक आंघोळ करून बाहेर आले तेव्हा त्यांना पोट भरल्याचे समजले. आंघोळ करून ते सरळ निघून गेले. द्रौपदीची ही समस्या श्रीकृष्णाने संपुष्टात आणली होती.
पांडवांनी 12 वर्षांचा वनवास पूर्ण केल्यावर अक्षय पात्र त्यांच्यासोबत राजवाड्यात आणलं होतं. मग या पात्राची गरजच नव्हती. पण, त्यांच्या वनवासात ही भांडी एक महत्त्वाची संपत्ती होती, ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. हे उघड आहे की, त्यावेळी त्यांना अक्षय पत्राची गरज नव्हती, मात्र हे चमत्कारिक भांडे त्यांना सूर्याकडून मिळाले होते, ते दैवी आशीर्वादाचे प्रतीक देखील होते. हे पात्र त्यांनी राजवाड्यात सजवून सुरक्षित ठेवले.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)