पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव; चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडची विजयी सलामी

 चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडने विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानवर 60 रन्सनी विजय मिळवला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 19, 2025, 10:53 PM IST
पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव; चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडची विजयी सलामी

PAK vs NZ Match Highlights, ICC Champions trophy 2025:  चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडनं विजय सलामी दिली आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 धावांनी दारुण पराभव केला आहे. विल यंग आणि कॅप्टन टॉम लॅथम न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. कॅप्टन टॉम लॅथमनं 118 रन्सची खेळी केली तर विल यंगनं 107 रन्सचं योगदान दिले. 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 320 धावांचा डोंगर रचला.  लॅथमने 104 चेंडूत 1180 धावांची नाबाद खेळी केली. तर विल यंगने 113 चेंडूत 107 धावा काढल्या. याशिवाय ग्लेन फिलिप्सने 39 चेंडूत 61 धावा काढल्या. त्यांच्यामुळे न्यूझीलंड संघाने 5 विकेट गमावून 320 धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 

न्यूझीलंडने टार्गेट दिलेल्या 320 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्ताची दमछाक झाली आणि त्यांची इनिंग 260 धावांत गुंडाळली. पाकिस्तानतर्फे बाबर आझम आणि खुशदिल शाहनं हाफ सेंच्युरी झळकावली. न्यूझीलंडच्या मिशेल सॅन्टनर आणि विल्यम ओरुरकेनं प्रत्येकी 3 विकेट्स घेत पाकिस्तानच्या इनिंगला खिंडार पाडलं.  पाकिस्तानची पुढील सामना भारताशी होणार आहे. तर,  न्यूझीलंडचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे.

पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीय. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीसाठी लढत होणारेय. 2017मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होतेय.

यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा हायब्रिड मॉड्युल स्वरुपात होणार आहे. कारण BCCIनं पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानं टीम इंडियाच्या ग्रुप स्टेजमधील मॅचेस या दुबईत खेळवल्या जाणार आहेत. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमधील इतर टीम्सच्या मॅचेस पाकिस्तानलमधील लाहोर, कराची आणि रावळपिंडीत होणारेत.