Hanuman favourite zodiac sign : अनेक जण हनुमानाची उपासना करतात. संकटावर मात करण्यासाठी ही उपासना महत्त्वाची मानली जाते. संकट टाळायचे असेल तर हनुमानाची कृपा गरजेची असते. हनुमानाची कृपा असेल तर व्यक्तीची त्रास आणि समस्यांपासून सुटका होते. बजरंगबली त्याचे रक्षण करतो. म्हणूनच लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास करतात, त्यांची पूजा करतात, हनुमानाला वस्त्र अर्पण करतात. पण काही राशीचे लोक या बाबतीत भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते, ज्यामुळे ते अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांपासून त्यांना अभय मिळते. एखाद्यावेळी त्यांच्यावर काही संकट आले तर ते त्यावर ते लवकर मात करतात. याशिवाय मंगल देवाच्या कृपेने हे लोक जमीन मालमत्तेचे मालकही होतात.
मेष : भगवान हनुमानाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांमध्ये खूप धैर्य, शक्ती, इच्छाशक्ती आणि एकाग्रता असते. सहसा त्यांचे आयुष्य आरामात जाते. एखादे आव्हान आले तरी ते निर्भयपणे सामोरे जातात. या लोकांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. मेष राशीवर मंगळाचे राज्य आहे आणि हे भगवान हनुमानाच्या आवडत्या चिन्हांपैकी एक आहे.
सिंह : या राशींच्या लोकांवर हनुमानीच नेहमी कृपा राहते. सिंह राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते त्यामुळे त्यांच्या मार्गात येणारी प्रत्येक अडचण बजरंगीबली दूर करतात. आयुष्यात खूप नाव, पैसा आणि सन्मान या राशीच्या लोकांना मिळतो. ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असतील त्यामध्ये ते खूप प्रगती करतात. या राशींचे लोक हे उत्तम नेतृत्व क्षमतेने समृद्ध असतात.
वृश्चिक : या राशीच्या लोकांची कामे बजरंगबलीच्या कृपेने पटक होतात. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो आणि ते आरामदायी जीवन जगतात. हनुमान वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळवून देण्यात मदत करतात.
कुंभ : हनुमानाची कुंभ राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. कष्टाच्या जोरावर त्यांना हवे ते मिळते आणि मिळत राहते. हनुमानजींची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि या लोकांच्या मनाप्रमाणे सर्व काही होत राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)