क्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप

पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.

Updated: Oct 25, 2015, 10:58 PM IST
क्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप title=

दिल्ली : पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.

मनोज तिवारी याविषयी म्हणतो की, मी हे सौरव गांगुलीलाही सांगितलं, याबाबतीत सौरव खूप निराश होता, आम्ही सौरव गांगुलीविषयी काहीही सहन करणार नाही. बंगालच्या या क्रिकेटरच्या मते गौतम गंभीर सत्य बोलत नाहीय, असं होतं, तर गंभीरला ७० तर आणि मला ४० टक्के दंड का लागला.

दिल्ली आणि बंगाल दरम्यान फिरोजशाह कोटला मैदानात रणजी ट्रॉफीचा तिसरा सामना काल होता, यात गंभीर आणि तिवारी एकमेकांना भिडले होते, हे भांडण शांत करण्यासाठी  अंपायर श्रीनाथ यांनाही हस्तक्षेप करावा लागला, मॅच रेफरी बुच यांनी दोन्ही खेळाडूंना बोलावून घेतलं, बुच यांनी विस्तारीत रिपोर्ट बीसीसीआयला पाठवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.