तुमच्या डोक्याला खूप खाज येते का? मग करा 'हे' 5 घरगुती उपाय, समस्या लगेच सुटेल

जर तुम्हाला खूप खाज येत असेल, तर काही घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय तुमच्या डोक्याची खाज दूर करण्यास मदत करतील आणि केसही मजबूत करू शकतील.

Updated: Feb 2, 2025, 01:06 PM IST
तुमच्या डोक्याला खूप खाज येते का? मग करा 'हे' 5 घरगुती उपाय, समस्या लगेच सुटेल title=

home remedies for head itching problem: डोक्यातील खाज ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेक कारणांमुळे होऊ शकते. ही समस्या सामान्य असली तरी याचा त्रास खूप जास्त होतो. डोक्यातील कोरडेपणा, कोंडा, अ‍ॅलर्जी किंवा संसर्ग यामुळे खाज येऊ शकते. जर तुम्हाला खूप खाज येत असेल, तर काही घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय तुमच्या डोक्याची खाज दूर करण्यास मदत करतील आणि केसही मजबूत करू शकतील.

डोक्यातील खाज कमी करण्याचे घरगुती उपाय

नारळ तेल आणि लिंबाचा रस

नारळ तेलात लिंबाचा रस मिसळून डोक्यावर लावा. हे मिश्रण डोक्यावरील कोरडी त्वचा मुलायम बनवते आणि कोंडा दूर करते. नारळ तेल केसांना पोषण देते, तर लिंबाचा रस डोक्याचा संसर्ग दूर करतो. याचा  नियमित वापर केल्यास डोक्यातील खाज पूर्णपणे बंद होऊ शकते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) केसांच्या मुळाशी लावून 15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा घरगुती उपाय डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतो आणि खाज कमी करतो. यामुळे डोक्यातील बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट होते. तसेच, केस मऊ आणि मजबूत होतात.

आवळा आणि शिकाकाई

आवळा आणि शिकाकाई यांची पेस्ट तयार करून डोक्यावर लावा. हे मिश्रण डोक्याची त्वचा निरोगी ठेवते आणि केसांच्या मुळांना पोषण देते. यामुळे डोक्यातील खाज आणि कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

कडू लिंबाचे तेल

कडू लिंबाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे तेल डोक्यावर 15-20 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर नीट धुवा.  कडू लिंबाच्या तेलामुळे डोक्याचा संसर्ग कमी होतो आणि केस चमकदार होऊ शकतात.

डोक्यातील खाज कमी करण्यासाठी काही खास टीप्स

  • नियमितपणे केस धुणे आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
  • जास्त वेळ केस ओले ठेवू नका, त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
  • केस आणि डोक्याची त्वचा कोरडी राहू नये म्हणून योग्य प्रमाणात तेल लावा.
  • गरम पाण्याने केस धुण्याऐवजी कोमट पाणी वापरा.
  • डोक्याला वारंवार खाजवू नका, त्यामुळे त्वचेला ओरखडे येऊ नुकसान होऊ शकते.
  • योग आणि ध्यान (मेडिटेशन) केल्याने तणाव कमी होतो. तणाव कमी झाल्याने शारिरीक समस्या लवकर सोडवता येतात.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)