कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल

Cricket Commentators Salary: भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर हे जगभरात सर्वाधिक मानधन घेणारे क्रीडा कॉमेंटेटर आहेत. भारताच्या अव्वल कॉमेंटेटरमध्ये हर्षा भोगले, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 2, 2025, 12:35 PM IST
कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल title=

Commentators Per Match Earning: भारतात क्रिकेट हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. लहान ते मोठे सगळेच आपल्या देशात क्रिकेट खेळतात. प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्याला एक दिवस आपल्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतो. यातील काही महान क्रिकेटपटू भविष्यात कुशल कॉमेंटेटरहि बनतील. पण, कॉमेंटेटर होण्यासाठी क्रिकेटपटू असणे आवश्यक नाही हेच अनेकांना माहित नाही. क्रिकेट कॉमेंटेटर होण्यासाठी, त्या व्यक्तीला  क्रिकेटचे नियम, तंत्र आणि खेळातील इतिहासाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्लेषण करण्याची आणि प्रेक्षकांना रेकॉर्ड समजावून सांगण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. भारताच्या अव्वल कॉमेंटेटरमध्ये हर्षा भोगले, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे.

क्रिकेट कॉमेंटेटरला किती पगार मिळतो?  

क्रिकेट कॉमेंटेटरला प्रत्येक सामन्यानुसार मानधन मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वरिष्ठ कॉमेंटेटरला ६ लाख ते १० लाख रुपये कमवू शकतात. अंदाजे, एखाद्या क्रिकेट कॉमेंटेटरने एका वर्षात 100 सामन्यांमध्येही कॉमेंट्री केली तर तो एकूण 10 कोटींहून अधिक कमाई करू शकतो. सध्याचे बीसीसीआयच्या क्रिकेटपटूच्या वार्षिक पगाराबद्दल बोलायचे झाल्यास,  A+ ग्रेडच्या क्रिकेटपटूला वार्षिक 7 कोटी रुपये पगार मिळतो. 

हे ही वाचा: सचिनला जीवनगौरव तर अश्विनचाही विशेष सन्मान! BCCI Awards 2023-24 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

 

वेतन असते करारावर अवलंबून

कॉमेंटेटर क्षेत्रातील वेतन देखील करारावर अवलंबून असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला प्रत्येक सामन्याचे उत्पन्न 2-3 लाख रुपये आहे. पुढे, जेव्हा काही कॉमेंटेटर करायचे अनुभव वाढतो तेव्हा ते 4-6 लाखांपर्यंत पोहोचते. याशिवाय, एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यानंतर, कॉमेंटेटरला 8-10 लाख रुपयांचे कंत्राट मिळू लागते. भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर हे जगभरात सर्वाधिक मानधन घेणारे क्रीडा कॉमेंटेटर आहेत. टीम इंडियाच्या सामन्यांव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर आयपीएल आणि परदेशी दौऱ्यांच्या मालिकेदरम्यान देखील कॉमेंटेटर म्हणून काम करतात.

 हे ही वाचा: टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद

 

कनिष्ठ स्तराचे कॉमेंटेटर किती कमावतात?

भारतातील एक कनिष्ठ कॉमेंटेटर समालोचक दररोज सुमारे 35,000 रुपये कमवू शकतो. तर अनुभवी टॉप क्लास कॉमेंटेटरला यापेक्षा खूप जास्त पगार मिळतो. अंदाजे त्यांचा पगार दररोज 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग असलेले कॉमेंटेटरही मोठ्या ब्रँडशी संबंधित आहेत आणि जाहिरातींद्वारे पैसे कमावतात. क्रीडा वाहिन्यांना कॉमेंटेटरची गरज असते. तिथे चांगले काम करणारे नंतर बीसीसीआय पॅनेलमध्ये सामील होतात.