5000 कोटींच्या भारतीय कंपनीचा मालक Ola ने घरी गेल्याने ट्रोल; तो म्हणाला, 'मी EMI...'

Rs 5000 crore Owner Traveled By Ola: त्यांची कृती सोशल मीडियावर चर्चेत असून एकीकडून कौतुक आणि दुसरीकडून टीका होत असतानाच ते यावर व्यक्त झालेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 2, 2025, 01:35 PM IST
5000 कोटींच्या भारतीय कंपनीचा मालक Ola ने घरी गेल्याने ट्रोल; तो म्हणाला, 'मी EMI...' title=
सोशल मीडियावरुन मांडलं मत

Rs 5000 crore Owner Traveled By Ola: 'थायरोकेअर' कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए. वेल्लूमणी हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील मोठ्या कार्यक्रमानंतर ए. वेल्लूमणी या हॉटेलबाहेरुन चक्क टॅक्सीने घरी गेले. 5 हजार कोटींचा मालक असलेला हा व्यक्ती अशाप्रकारे टॅक्सीने घरी गेल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी असं का केलं असावं याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेकांनी यावरुन ए. वेल्लूमणी यांना यावरुन ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगनंतर आता स्वत: ए. वेल्लूमणी यांनी या साऱ्या प्रकरणावर मत व्यक्त केलं आहे.

रोज पाच किलोमीटरची पायपीट

ए. वेल्लूमणी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून आजचा यशस्वी उद्योजक हा प्रवास कसा केला हे सांगितलं आहे. 1965 ते 1982 दरम्यानचं आपलं संपूर्ण आयुष्य खेडेगावात गेलं. रोज शाळेत जाण्यासाठी आपल्याला पाच किलोमीटर पायपीट करावी लागायची. 1980 साली ए. वेल्लूमणी यांना पहिल्यांदा सेकेंड हॅण्ड सायकल मिळाली. मुंबईमध्ये आल्यानंतर 1982 ते 1992 दरम्यान अणुशक्ती नगर ते परळमधील टाटा मेमोरिअल रुग्णालयादरम्यानचं अंतर ए. वेल्लूमणी ये-जा करायचे. काही श्रीमंत सहकारी टॅक्सीने यायचे-जायचे तर मध्यमवर्गीय लोक बसने ये-जा करायचे. मात्र कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून ए. वेल्लूमणी आणि त्यांचे इतर तीन सहकारी रोज 2 किलोमीटरचं अंतर पायी चालत जायचे.

...म्हणून ओला, उबर लक्झरीच

1992 ते 2002 दरम्यान ए. वेल्लूमणी हे ठाणे आणि परळदरम्यानचा प्रवास एसटी बसने आणि लोकल ट्रेनच्या सेकेण्ड क्लासने प्रवास करायचे. त्यांनी 1993 साली पहिली स्कूटर विकत घेतली. 2002 ते 2022 मध्ये थायरोकेअरा नफा होत गेला त्याप्रमाणे ए. वेल्लूमणी टॅक्सी, रिक्षाने प्रवास करु लागले. त्यांनी 2004 साली त्यांची पहिली कार, टोयोटा क्वालिस विकत घेतली. त्यावेळी कंपनीचा टर्नओव्हर 50 कोटींच्या वर पोहोचला होता म्हणूनच त्यांनी कार घ्यायची हिंमत केली.

नक्की पाहा हे फोटो >> आधी महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी अन् आता डबल साइजचं घरं? शाहरुखला 2 आठवड्यात 2 लॉटरी

2021 पासून ए. वेल्लूमणी यांच्या कुटुंबाकडे एमजीची ईव्ही कार आहे. तसेच त्यांच्याकडे स्कोडा कंपनीचीही कार आहे. मात्र आजही ओला, उबर आपल्याला लक्झरी सेवाच वाटते कारण अजूनही 90 टक्के भारतीयांना ही सोय वापरता येत नाही, असं ए. वेल्लूमणी यांचं म्हणणं आहे. 

अनावश्यक कर्ज न घेण्याचा सल्ला

ए. वेल्लूमणी यांनी आपली काटकसर करण्याची सवयच यशस्वी होण्यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 'मी ईएमआय जनरेशनमधला आहे,' असंही ए. वेल्लूमणी म्हणतात. सुरक्षित भविष्यासाठी गरज नसताना कर्ज घेऊ नका असा सल्ला ए. वेल्लूमणींनी दिला आहे. आपल्या कृतीचं कौतुक करणाऱ्यांचं आणि विरोध करणाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं आहे. काहींना यामध्ये व्यक्तीमधील गुणधर्म दिसतील तर काहीजण यावरुन ट्रोलिंग करतील असं ए. वेल्लूमणी म्हणालेत.

शेतजमीनही नावावर नसलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्म ते 5000 कोटींचा मालक

ए. वेल्लूमणी यांचा जन्म तामिळनाडूमधील छोट्याश्या गावात साधी शेतजमीनही नावावर नसलेल्या शेतकऱ्याच्या घरात झाला. गरीबीमधून बाहेर पडायचं असं मनाशी पक्क करुन ए. वेल्लूमणी यांनी मद्रास विद्यापिठामधील 1978 साली रसायनशास्रामध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांना 1982 साली मुंबईत भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये सहाय्यक वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. जीवशास्राचं ज्ञान नसतानाही ते जीवशास्र आणि बायोकेमिस्ट्रीसारखे विषय शिकले. 1995 साली त्यांनी थायरोकेअर कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीचं मूल्य 5000 कोटी रुपये इतकं आहे.