अश्विनची बरोबरी करत जडेजानं 'सर' केला पहिला रँक

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयानंतर रविंद्र जडेजा आर. अश्विनसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलाय.

Updated: Mar 8, 2017, 05:28 PM IST
अश्विनची बरोबरी करत जडेजानं 'सर' केला पहिला रँक title=

दुबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयानंतर रविंद्र जडेजा आर. अश्विनसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलाय. पहिल्या क्रमांकावर येणारी ही जगातली स्पिनर्सची पहिली जोडी ठरलीय. 

सर जडेजानं फिरकीपटू आर. अश्विनची बरोबरी करत अग्रस्थान गाठलं. जडेजाने कालच्या सामन्यात ६३ धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे भारताला विजय मिळविणं शक्य झालं. 

याआधी जडेजा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या करीअरमध्ये तो पहिल्यांदा टॉप रँकवर आलाय.

आता जडेजा आणि अश्विन दोघांच्याही खात्यात प्रत्येकी ८७८ विकेट्स आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या मनगटाच्या जोरावर अनेकदा भारतीय संघाची मदार सांभाळली आहे. सामन्यादरम्यान या दोघांमध्ये नेहमी सल्ल्यांची  देवाण-घेवाण सुरु असते.