मुंबई : मुंबईच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळल मौन बाळगणे पसंत केले. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या १५ वर्षांत या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास केला नाही. गुंडागर्दी, दादागिरी केली. जमिनींवर, झोपड्डीवर कब्जा करणारे लोक तुम्हाला हवे आहेत का?, असा सवार मोदी यांनी मुंबईकरांना विचारला.
महाराष्ट्रात सर्वाधिक जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात जास्त जातीय दंगली होत आहेत, याला कोण जबाबदार आहे?, असा सवाल करत मुंबईच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई विमानतळचा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि त्याचे उद्घाटन या पाच वर्षांत करु. तसेच सी लिंक उभारणार आणि उपनगरीय रेल्वेचा चेहरा बदलणार. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी मुंबईतील जाहीर सभेत दिले.
भारतात २००२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल हे माझं आश्वासन आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मुंबईची आर्थिक प्रगती शक्य नाही आणि महाराष्ट्र पिछाडीवर राहिला तर, संपूर्ण देश मागे पडेल. संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देण्याची ताकद मुंबईत आहे. केंद्रात भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले तर, विकास निश्चित आहे, असे मोदी म्हणालेत.
मुंबईतील सभेतील ठळक मुद्दे
- सर्वांनी स्वच्छतेचा वसा घ्या. जाताना तुम्ही येथील कचरा उचला.
- मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी पूर्ण बहुमत द्या.
- मुंबई आणि महाराष्ट्रात तीव्र आर्थिक विकासाच्या शिडीची गरज आहे.
- काँग्रेसचे सरकार आले, तर मला महाराष्ट्राचा विकास करता येणार नाही. ते माझ्यासाठी फाटकच बंद करतील.
- आपण बहुमताचा स्पष्ट निर्णय करा. दिल्लीही ज्यांचं ऐकेल आणि जे दिल्लीचं ऐकतील असं सरकार बनवा. भाजपचं सरकार बनवलंत तर ते सहज होईल.
- डेंग्यू, मलेरिया, टीबी या तीन आजारांवर कमीत कमी किंमतीत औषध निर्मितीसाठी भारत-अमेरिका एकत्रित प्रयत्न करणार.
- मुंबईतील रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी जगभरातून निधी आणणार.
- देशातील सर्वात उत्तम मेट्रो मुंबईत आमच्याच कार्यकाळात सुरू होईल.
- नवी मुंबई विमानतळ, मुंबईतील सी-लिंक आमच्याच कार्यकाळात पूर्ण करू, त्याचं उद्घाटन करू.
- २०२२ च्या १५ ऑगस्टपर्यंत झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वतंत्र घर, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यव्यवस्था असेल.
- ६० वर्षांत मोठं व्हिजन पाहिलं, पण ते देशातील छोट्यांच्या कामी आलं नाही. मी सामान्य आहे. छोट्या लोकांसाठी मोठी कामं करेन.
- तुम्ही थोडी जरी चूक केलीत, तरी त्यांना अशी नशा चढेल की संपूर्ण देशाचं नुकसान होईल.
- महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला असहाय सोडता येणार नाही.
- महाराष्ट्र कुणाच्या हाती सोपवायचा हा निर्णय मुंबई करणार आहे.
- महाराष्ट्रात जास्त जातीय दंगली होत आहेत, याला कोण जबाबदार आहे?
- भाजपचा जन्म मुंबईत झाला.
- जो भारताचं पूजन करेल, तो भारताचा होईल, या धारणेनं पुढे जायचंय. सगळ्यांना सोबत घेऊन विकास करायचाय!
- देश बदलतोय, तरुणांची स्वप्नं समजून घेण्याची गरज आहे. भाषा-प्रांतवादाची भांडणं खूप झाली, तरुणांना विकास हवाय
- काँग्रेस - राष्ट्रवादीनं खुर्चीचा खेळ केला, पण जनतेला न्याय मिळाला नाही.
- मोदींना कोण जास्त शिव्या देईल, त्यांच्यावर कोण जास्त टीका करेल याची काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे.
- मोदींवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे.
- गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राला काय मिळालं, मुंबईला काय मिळालं याचा हिशोब करा.
- मुंबईकरांना दिली सर्वांगीण विकासाची ग्वाही.
- नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.