राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.

Updated: Aug 28, 2015, 03:03 PM IST
राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा... title=

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.

लंडन येथील आंबेडकरांच्या घराचा घरमालक आणि राज्य सरकार यांच्यात गुरुवारी तसा करार झाला. राज्य सरकारनं घराच्या एकूण किंमती पैंकी १० टक्के रक्कम देऊन हा करार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल साईट ट्वीटरवरुन ही माहिती दिलीय.

 

खरेदी प्रकिया पूर्ण झाल्यानंतर घराची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. बाबासाहेब आंबेडकराचं लंडन येथील घर ३१ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलंय. त्यापैकी १० टक्के म्हणजेच ३ कोटी १० लाख रुपये घरमालकाला अदा करण्यात आलीय. 

राज्य सरकार या घर खरेदी करुन त्या ठिकाणी त्याचं स्मारकात रुपांतर करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.