औरंगाबाद : राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.
राज्यात सगळीकडे धो धो बरसणारा वरूणराजा मराठवाड्यात मात्र अजूनही जेमतेमच आहे. अजूनही मराठवाड्याची पावसाची प्रतिक्षा संपलेली नाहीय. मराठवाड्यातल्या पाण्याची सद्यस्थिती खूपच कमी आहे.
पावसाअभावी केंद्र बंद करण्याची वेळ आलीय. परळी वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणा-या माजलगाव धरणात मृतसाठा आहे. तेही पाणी पिण्यासाठी राखीव आहे. त्यामुळं वीजनिर्मितीसाठी पाणी कसं मिळवता येईल याबाबत प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.