Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच

Tilak Varma Viral shot: तिलक वर्माने 150.3 kmph वेगाने आलेल्या इंग्लंडचा भयानक गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर असा जबरदस्त षटकार ठोकला की त्याचे सर्वत्र कौतुक होत होते.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 26, 2025, 11:29 AM IST
Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच title=

Tilak Varma Sixes in Chennai T20I:  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाच्या इंग्लंडवर (India vs England 2nd T20I) 2 गडी राखून झालेल्या विजयाचा हिरो होता 'तिलक वर्मा'. तिलक वर्माने 72 धावांच्या नाबाद खेळीत 5 षटकार ठोकले.  त्याच्या या नाबाद अर्धशतकाने सामना जिंकला मदत केली. त्याच्या या शानदार खेळीत 5 षटकार आणि 4 चौकारांचाही समावेश आहे. सतत पडणाऱ्या विकेट्सला थांबवून त्याने भारताला सामना जिंकण्यात मदत केल्याबद्दल त्याचे खूप कौतुक होत आहे. शिवाय त्याच्या एका शॉटचे फार कौतुक होत आहे. तिलकने हा शॉट जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मारला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

चेंडूच्या दुप्पट वेगाने मारला षटकार 

कर्णधार जोस बटलरने डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चरला बोलावले. त्याच्या बॉलवर तिलकने पहिला चेंडू चार धावांवर पाठवून षटकाची सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर त्याने असा फटका मारला की, स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येकजण ते पाहून हैराण झाला.150.3 किमी प्रतितास वेगाने आलेल्या या चेंडूवर तिलक वर्माने षटकार ठोकला, ज्यामुळे भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एक चेंडू सोडून तिलकने पुन्हा षटकार मारला. या षटकात त्याच्याच बॅटमधून एकूण १७ धावा निघाल्या.

हे ही वाचा: 10वी उत्तीर्ण, स्टेशनवर घालवल्या रात्र... फक्त 1000 रुपयात सुरु केला व्यवसाय आज उभारले 84216 कोटी रुपयांचे साम्राज्य

 

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

आर्चरच्या चेंडूंवर मारले भरपूर षटकार 

जोफ्रा आर्चरचे चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळण्याऐवजी तिलक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याने 72 धावांच्या नाबाद खेळीत मारलेल्या पाच षटकारांपैकी चार षटकार आर्चरच्या चेंडूवर मारले. पाचव्या षटकात दोन आणि 16व्या षटकात दोन. तिलक वर्माला त्याच्या या मॅचविनिंग इनिंगसाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

हे ही वाचा: वयाच्या २१व्या वर्षी मराठी मुलगी बनली मिस इंडिया, फिल्मी करिअर फ्लॉप, नंतर सुपरस्टारशी लग्न करून सोडली इंडस्ट्री; आज आहे करोडोंची मालकीण

 

विजयानंतर तिलककाय म्हणाला?

विजयानंतर 22 वर्षीय फलंदाज तिलक वर्मा म्हणाला की, " विकेट थोडी दुतर्फा होती. मी काल गौतम सरांशी बोलत होतो, ते म्हणाले, काहीही झाले तरी परिस्थितीनुसार खेळावे लागेल, लवचिक असायला हवे. 'डावी-उजवी फलंदाजी करण्याचा एक चांगला पर्याय असेल आणि गोलंदाजांसाठी ते थोडे कठीण जाईल, कारण त्यांना त्यांची लाइन आणि लांबी बदलावी लागेल." 

हे ही वाचा: 2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल

शॉर्ट बॉलच्या विरोधात आपल्या गेमप्लॅनबद्दल तिलक म्हणाला, "आम्ही दक्षिण आफ्रिकेत आधीच खेळलो आहोत, प्रत्यक्षात यापेक्षा कठीण होते. आम्ही तयारी केली पण आर्चर आणि वुड खरोखर वेगवान आहेत. सर्वांनी चांगली तयारी केली, आम्ही नेटमध्ये खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे आम्हाला निकाल मिळाला."