काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात डुबकी मारण्यासाठी दररोज लाखो भाविक येतात. यामध्ये कलाकार, नेते आणि अनेक दिग्गज मंडळीही महाकुंभला पोहोचत आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 26, 2025, 12:58 PM IST
काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल title=

Remo D'Souza Reached Maha Kumbh: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून ते राजकारणी आणि अनेक बड्या हस्ती देखील महाकुंभला पोहोचत आहेत. अलीकडेच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि गायक गुरू रंधावा यांनीही महाकुंभ मेळ्यात स्नान केले. त्यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूडचा कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाही महाकुंभला पोहोचला आहे. मात्र, यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याला ओळखणे सोपे नव्हते, कारण तो काळ्या रंगाच्या वेशात तेथे पोहोचला होता.

नुकताच रेमो डिसूजाने त्याच्या इंस्टाग्रामवर महाकुंभचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो काळे कपडे परिधान करून, खांद्यावर बॅग घेऊन आणि काळ्या शालने चेहरा लपवत महाकुंभमध्ये फिरताना दिसत आहे. त्याच्या आउटफिटने त्याचे चाहते आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्यचकित केले. चाहत्यांनीही रेमोच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्याचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये रेमो कधी संगम घाटावर आंघोळ करताना दिसत आहे तर कधी ध्यान करताना तर कधी गर्दीत फिरताना दिसत आहे. 

रेमो डिसूजाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव 

यासोबतच त्याने बोटीत बसून महाकुंभाचा देखावाही चाहत्यांना दाखवला. रेमो डिसूजा एका सामान्य भक्ताप्रमाणे महाकुंभात फिरत होता. त्यामुळेच त्याला महाकुंभात कोणत्याही प्रकारची विशेष किंवा VIP वागणूक मिळाली नाही. त्यानी संगमात स्नान देखील केले. त्यासोबत रेमोने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हात जोडलेल्या इमोजीसह रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. तसेच महाकुंभचे काही हॅशटॅग देखील दिले आहेत. रेमोच्या या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत, त्याच्या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगनेही रेमोचे कौतुक केले आहे. तिने म्हटले आहे की, 'रेमो सर तुमची ही बाजू पाहून मला खूप आनंद झाला. तर एका चाहत्याने लिहिले की, 'व्वा सर, तुम्ही गुपचूप आलात आणि कोणालाच कळले नाही.' आणखी एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही आम्हाला सरप्राईज केलं'. रेमो पत्नीसोबत महाकुंभला पोहोचला होता. तेथे त्यांनी स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांचीही भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले.