भिवंडी : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळलीय. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतीय.
बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय. या ढिगाऱ्याखालून जवळपास १० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय.
सकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. बोईवाडा परिसरातील तांडेल मोहल्ला इथं ही घटना घडलीय. जखमींना तातडीनं जवळच्याच इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय.
जवळपास ४० वर्षांपूर्वीच्या मोडकळीस आलेल्या या इमारतीत केवळ एक कुटुंब वास्तव्यास होतं. त्यामुळे, अधिक जीवितहानी झालेली नाही. घटना घडली तेव्हा अस्तक बेग, परवेझ बेग आणि अन्वर बेग या तीन जणांचे कुटुंबीय या इमारतीत होते.