नाशिक : शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाशिक ग्राहक न्यायालयाने हा निकाल दिला आहे. खरेदीखत आणि पूर्णत्वाचा दाखला न दिल्याने या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
बिल्डर पांडुरंग बोधले, प्रविण धात्रक, नितीन धात्रक आणि नंदकिशोर आधारकर यांनी खरेदीखत देण्यास उशिर केल्याने ग्राहकमंचाने ही शिक्षा ठोठावली आहे.