अभिनेत्री सनी लिऑन म्हणते मला आई व्हायचं पण...

 सध्या माझा आई होण्याचा विचार नाही. मी आता सर्व ध्यान माझ्या करीअरवर केंद्रीत करीत आहे, असे बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनने म्हटले आहे. ३४ वर्षीय सनी हिचे लग्न झाले असून पती डॅनियल वेबर याच्याशी झाले आहे. 

Updated: Dec 23, 2015, 05:47 PM IST
 अभिनेत्री सनी लिऑन म्हणते मला आई व्हायचं पण...  title=

मुंबई :  सध्या माझा आई होण्याचा विचार नाही. मी आता सर्व ध्यान माझ्या करीअरवर केंद्रीत करीत आहे, असे बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनने म्हटले आहे. ३४ वर्षीय सनी हिचे लग्न झाले असून पती डॅनियल वेबर याच्याशी झाले आहे. 

'जिस्म २'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सनीला गिल्ड पुरस्कारावेळी रेड कार्पेटवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी ती म्हणाली, मी एक महिला आहे, मलाही आई व्हायला आवडेल. पण आता असा काही विचार नाही, असे सनी लिऑन म्हटली आहे. 

सनी आगामी फिल्म 'मस्तीजादे' येत्या २९ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.