Samay Rainas India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) इंडियाज गॉट लँटेंटमध्ये (India's Got Latent) केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या गदारोळ माजला आहे. सर्व स्तरातून रणवीरसह समय रैनासह जोरदार टीका केली जात आहे. थेट मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली असून, मुंबई पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी सर्व परीक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. सर्वांचा जबाब नोंदवला जात असून, कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान समय रैनाने (Samay Raina) इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) शेअर केली आहे.
मी माझ्या चॅनेलवरुन 'इंडियाज गॉट लँटेंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत," असं समय रैनाने जाहीर केलं आहे. तसंच सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन असं आश्वासन दिलं आहे.
"जे काही सुरु आहे ते हाताळणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी माझ्या चॅनेलवरुन इंडियाज गॉट लेटंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत. माझा एकमेव हेतू फक्त लोकांना हसवणं आणि चांगला वेळ देणं आहे. सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन," असं समय रैनाने सांगितलं आहे.
दरम्यान समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांना सांगितलं होतं की, समय सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तो १७ मार्चला मुंबईत परतणार आहे. मात्र मुंबई पोलिसांनी ही विनंती फेटाळली आहे. इतके दिवस पोलीस तपास थांबवता येणार नाही. त्यामुळे चौकशी सुरू झाल्यापासून १४ दिवसांत त्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झालेले आशिष चंचलानी, अपूर्व मखिजा यांच्यासह शोचे मालक बलराज घई यांच्यासह तीन लोकांचे जबाब नोंदवण्यात आले.
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) 'इंडियाज गॉट लँटेंट'मध्ये युट्यूबर्सनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्व मखीजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी यांसारख्या कंटेंट निर्मात्यांनी तसेच शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांनी केलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.