मुंबई : खिलाडी कुमार अक्षय रावडी राठोड या सिनेमानंतर पुन्हा एकदा डबल रोलमध्ये दिसणार आहे.
इक्का असं या सिनेमाचं नाव असून, या आगामी सिनेमात अक्षय कुमारचा डबल धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
सध्या अक्षय त्याच्या 'रुस्तम' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या पोस्ट रीलीज प्रमोशननंतरच तो इक्का या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.