मी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू

गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.  

Updated: May 27, 2015, 10:26 AM IST
मी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू title=

नवी दिल्ली: गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.  

बीफ खाणाऱ्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावं, असं विधान केंद्रीय राज्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर किरण रिजिजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षातील नेत्यांनाच खुलं आव्हान दिलं आहे. 

भारतात लोकशाही असून प्रत्येक राज्यातील भावना वेगवेगळ्या असतात. मिझो ख्रिश्ननांमध्ये गोमांस खाण्याची पद्धत असेल तर त्यावर पंजाब किंवा हरियाणात राहणाऱ्यांनी आक्षेप घेण्याची गरज काय? असा सवालही रिजिजू यांनी उपस्थित केला. 

प्रत्येक राज्यामधील चित्र वेगळं असून महाराष्ट्र, गुजरातसारख्या हिंदुंची संख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये गोमांस बंदी केली असेल तर तो त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.