मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या केलेल्या नकलेने गाजला. तर दुसऱ्या दिवशी चर्चा होती ती भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उडवलेल्या खिल्लीची.
नितेश राणे यांनी डिवचलं
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)विधानभवनात प्रवेश करत असताना विधीभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना डिवचलं. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ... म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे यांच्या या कृतीवर भाजपचे इतर नेतेही हसत होते.
नवाब मलिक यांनी फोटो केला शेअर
नितेश राणे यांनी केलेल्या कृत्यावर काल शिवसेनेने (ShivSena) जशास तसं उत्तर दिलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोंबड्याचा फोटो शेअर केला आहे, पण हा कॉकटेल कोंबडा आहे. कोंबड्याचा चेहऱ्यावर मांजरीचा चेहरा चिकटवण्यात आला आहे. या फोटवर त्यांनी पैहचान कौन? असं लिहिलं आहे. हा फोटो मॉर्फ्ड करुन बनवण्यात आला आहे. या फोटोतून नवाब मलिक यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेचं नितेश राणे यांना उत्तर
नितेश राणे यांच्या कृत्यावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी जशास तसं उत्तर दिलं. भाजपवाल्यांची यातून संस्कृती दिसून येते असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आवाज काढण्याच जे काम झालं, मला असं वाटतं की वाघाला बघून मांजर म्याव म्यावच करणार. आणि ज्याने हा आवाज काढला त्याने कॉ...कॉ..कॉ केलं केलं असतं तरीही मला आश्चर्य वाटलं नसतं असा टोला लगावत सुनील प्रभू यांनी वाघ हा वाघच असतो, वाघाला बघून मांजर ओरडते, म्हणून त्यांनी म्याव म्याव केलं, असं म्हटलं आहे
'म्हणून म्याव म्याव केलं'
नितेश राणे यांनी केलेल्या या कृत्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्था मांजरी सारखी झाली आहे, म्हणू मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ... म्याऊ... केलं असं नितेश राणे यांनी म्हटलं.