Amitabh Bacchan X Post: बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन सध्या सोनी टिव्ही वरील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये व्यस्त आहेत. नुकतेच त्यांच्या शोमध्ये समय रैना, भूवन बम, तन्मय भट्ट हे युट्युबर आले होते. त्यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या समय रैना आणि तन्मय भट्ट यांनी बिग बींसोबत अनेक किस्से शेअर केले. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतायत. बिग बी आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियात शेअर करत असतात. नुकत्याच त्यांनी केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांचे टेन्शन वाढले. काय आहे ही पोस्ट? जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन दिवसभरात कितीही व्यस्त असले तरी ते रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात. काल 7 फेब्रुवारीरोजी त्यांनी असं ट्वीट केलं की त्यांचे सारे फॅन्स घाबरले. सर्वकाही ठिक आहे ना? असं त्यांना विचारु लागले. 82 वर्षाच्या अमिताभ बच्चन यांनी 7 फेब्रुवारी रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी एक ट्विट केले. 'जायची वेळ आली आहे.' असे या पोस्टचे शब्द होते. त्यावर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
T 5281 - time to go ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 7, 2025
असे म्हणून नका सर असे अशी कमेंट एका यूजरने केली. काय झालंय सर? असे म्हणत दुसऱ्या यूजरने काळजी व्यक्त केली. अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटवर कोणते स्पष्टीकरण दिले नाही.त्यांनी जाण्याबद्दल म्हटलं, त्यांना यातून काहीतरी सांगायचय आणि फॅन्स त्याचे आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावत आहेत.
अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चन याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी एक फोटो शेअर केला होता. अभिषेक बच्चनला इन्क्यूबेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि अमिताभ बच्चन वॉर्डमध्ये उभे राहून त्याला पाहत होते, त्यावेळचा हा फोटो आहे.
अमिताभ यांच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या 'कौन बनेगा करोडपती 16' होस्ट करतायत. ते 2024 मध्ये रजनीकांत स्टारर 'वेटियन'मध्ये दिसले होते. सध्या तरी त्यांनी कोणत्या नव्या सिनेमाची घोषणा केली नाही. पण ते नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये दिसू शकतात, असं म्हटलं जातंय.