Amitabh Bachchan : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपति 16' या शोची किती लोकप्रियता आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये मुंबईतून ऋत्विक डे हा हॉट सीटवर बसले होते. पण स्टेजवर आल्यानंतर ऋत्विक हा संपूर्ण स्टेजच्या चारही बाजुंना हात वर करुन फिरू लागला. बिग बींनी त्याला विचारलं की असं का केलं. तर त्याचं उत्तर देत तो म्हणाला की केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्न हे त्याच्या वडिलांचं होतं.
बिग बींनी त्यानंतर खेळाची सुरुवात केली आणि पहिला प्रश्न हा 5000 रुपयांसाठी होता. यातील कोणती क्रिया केल्यानं तुम्हाला गुणाकार म्हणून विषम संख्या उत्तर मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्यानं ऋत्विकनं 'ज्ञानास्त्र' या लाइफ-लाइनचा वापर केला. तर अमिताभ बच्चन त्याला उत्तर काय असेल याचा अंदाज लावण्यास सांगितलं. त्यानंतर ऋत्विकनं ऑप्शन B) 6 एक्स 2 चुनानिवडला. पण हे उत्तर चुकीचं निघालं आणि योग्य उत्तर हे 7 एक्स 3 होतं.
या खेळाच्या सुरुवातीनंतर ऋतिकवशी गप्पा मारताना ऋत्विकनं सांगितलं की त्याला सर्वसामान्य विमानांच्या तुलनेत मोठे विमान बनवायचे आहेत. त्यानं त्यानंतर त्याचा लोगो देखील दाखवला आणि सांगितलं की त्याचं नाव तो 'शार्क एयरलाइंस' ठेवणार आहे. ऋत्विकनं पुढे सांगितलं की मध्यमवर्गी लोकांना प्रवास करता यावा यासाठी तो या विमानाचं भाडं देखील कमी ठेवणार. जेणेकरून सगळ्यांना विमानानं प्रवास करता येईल. तर इकोनॉमी आणि बिझनेस क्लासचं भाडं देखील त्यांनी सांगितलं. बिग बींनी विचारलं की हा विचार त्याला कधी आला.
त्यानंतर अमिताभ बच्चन ऋत्विक यशस्वी होईल असं म्हटलं. तर त्या छोट्या मुलानं लगेच प्रश्न विचारला की 'तुम्ही माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कराल का?' हे ऐकताच अमिताभ यांना आश्चर्य झालं आणि मस्करीत त्यांनी या प्रश्नाला टाळलं आणि पुढचा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, ऋत्विक थांबले नाही आणि त्यानं पुन्हा एकदा अमिताभ यांना अडवलं. त्यानं विचारलं की 'तुमच्याकडे एक प्रायव्हेट जेट आहे का? जे ऐकताच सगळ्यांना आश्चर्य झालं.' पुढे परत तो म्हणाला, 'सर, मी ऐकलंय की तुमच्याकडे एक प्रायव्हेट जेट आहे तर तुम्हाला चालवता येतो का?'
हेही वाचा : लकी अली वयाच्या 66 व्या वर्षी चौथं लग्न करणार? म्हणतो...
ऋत्विकचे इतके प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणाले, 'ना माझ्याकडे प्रायव्हेट जेट आहे आणि नाही मला ते कसं चालवतात ते माहित आहे. इतकंच नाही तर मी तुझ्या कंपनीत गुंतवणूक देखील करु शकणार नाही. कारण माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी गुंतवणूक करू शकेन.' अमिताभ यांनी दिलेल्या या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं.