Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव

Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा. 

नेहा चौधरी | Updated: Feb 15, 2024, 08:41 AM IST
Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव title=
Mumbai News Water crisis for Mumbaikars from March 1 and 10 percent water reduction proposal to municipal commissioner

Mumbai Water Scarcity : मुंबईची तहान भोगवणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीच संकट कोसळण्याची शक्यता आहे. उन्हाळ्या सुरु होण्याच्या पूर्वी होळीच्या आधी मुंबईकरांवर पाणीकपताची संकट ओढवण्याची शक्यता आहे. कारण 1 मार्चपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात करण्यात यावं असा प्रस्ताव मुंबई पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. 

या प्रस्तावानुसार सातही तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून 48 टक्के पाणीसाठा आता उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांची दररोजची गरज पाहता पाणी विभागाला राखीव साठा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर हा राखीव साठा देण्यात आला नाही तर मुंबईकरांना 1 मार्चपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपातीला सामोरे जावं लागणार आहे. सातही धरणातील पाणीसाठा पाहता गेल्या तीन वर्षांमध्ये हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याच समोर आले आहे.

 मान्सून सक्रीय होऊपर्यंत जर मुंबईकरांची तहान भागवायची असेल तर राखीव साठा किंवा पाणीकपात हे दोनच पर्याय मुंबई महानगर पालिकेकडे असणार आहे. त्यामुळे ते कुठला निर्णय घेता याकडे मुंबईकरांच लक्ष लागलं आहे. खरं तर साधारण एप्रिल किंवा मे महिन्यात मुंबईकरांवर पाणीकपातीच संकट ओढवतं. मात्र यंदा मार्च महिन्यातच हे संकट कोसळणार असल्याच चित्र आहे. 

13 फेब्रुवारीला धरणातील पाणीसाठा किती ? (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - 1,88,402
मोडक सागर - 55,077
तानसा - 83,522
मध्य वैतरणा - 16,964
भातसा - 3,49,678
विहार - 16,235
तुळशी - 4734

तीन वर्षांत 13 ऑगस्टची स्थिती

2024- 7,14,613
2023 -7,93,707 
2022 - 8,29,183