मुंबई : पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळात उमटले.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिरोळचे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजप बरोबर रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यी भेट घेतली. त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला. असा गंभीर आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिला आहे.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.
अजून पुरावे काय पाहिजेत.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2021