मुंबई : तीन राजकीय पक्षांचे सरकार. त्यांच्यात ताळमेळ नाही. सातत्याने त्यांच्यातील कुरबुरी चव्हाट्यावर येत आहेत. उद्धव ठाकरे, हे काय राज्य चालवणार, अशी विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडविण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्यावेळी ठाकरे सरकार मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.
गेल्या काही दिवसात यांच्यात आणि त्यांच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही. हे सरकार चांगले काम करीत आहे. यांच्यात कोणताही वाद नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे, असा दाखला यावेळी त्यांनी जोडला.
लॉकऊनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद होते. यासंदर्भातील बातम्यांवरील प्रश्नावरुन पवार यांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. लॉकडाऊनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अॅक्टिव्हिटी थांबल्या आहेत. लॉकऊनचे परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झाले आहे. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवे असते ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. बाळासाहेब जितके रोखठोक तितकेच दिलदार होते. राजकारणात अशा दुर्मिळ व्यक्ती आहेत. त्यात एक बाळासाहेब. त्यांनी एक भूमिका घेतली की ते मागे पुढे पाहणार नव्हते. पक्ष संघटनेचे काय होईल? आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा फैसला करणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले असं नाही तर आम्हाला सगळ्यांना धक्काच बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारसुद्धा उभा करणार नाही! त्याचे कारण काँगेससंबंधी त्यांच्या मनात तसा विद्वेष नव्हता. काही धोरणांसंबंधी स्पष्ट मते होती. त्यामुळे तो एक वेगळा पैलू त्यावेळी पाहायला मिळाला. आज तशीच काहीसी परिस्थिती आहे. आज कमीजास्त प्रमाणात त्याच मार्गाने उद्धव ठाकरे चाललेत, असे म्हणायला हरकत नाही, असेही पवार म्हणाले.