मुंबई : BJP leader Prasad Lad News : भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने प्रसाद लाड यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी प्रसाद लाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. (BJP leader Prasad Lad seeks protection in Mumbai High Court)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून प्रसाद लाड यांची ओळख आहे. प्रसाद लाड यांनी 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी 2014 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. प्रसाद लाड यांना गतवर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशीसाठी समन्स बजावले होते.
दरम्यान, एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली 5 वर्षांपूर्वी तक्रार दाखल झाली होती. हे प्रकरण संपले होते. आता पुन्हा ते उकरून काढून माझ्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबतची त्यांनी तशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.