Virla Video : मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगूळाचे लाडू वाटण्याची प्रथा आहे. हे तिळगूळ वाटताना तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर बायको आणि तिळगूळ...असा आशयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे. हा व्हिडीओ एक बाजारातील आहे. जिथे महिला, पुरुष, तरुण तरुणी बाजारात कामासाठी आले आहेत.
या बाजारातील एक कोपऱ्यात एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. रस्त्यावरुन जाणारा प्रत्येक जण मग तो महिला असो किंवा पुरुष त्या तरुणाच्या हातातील पाटी पाहून हसू आवरु शकत नाहीय. अनेक जण तर त्या तरुणाचा फोटो काढतानाही दिसत आहे. व्हिडीओमध्ये सगळे लोक कुठे पाहून आणि का हसत आहे, हे सुरुवातीला समजत नाही.
1.30 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शेवटच्या क्षणी तरुणीचा हातातील पाटीवर काय लिहिलंय ते दिसून येतं. महाराष्ट्रात खरं तर पुणेरी पाट्या खूप प्रसिद्ध आहेत. पण सोशल मीडियावर या तरुणाच्या पाट्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. कधी मजेशीर तर कधी प्रेरणादायी मेसेज तो या पाटीवर लिहित असतो. या पाट्या घेऊन तो शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभा असतो.
सध्या मकर संक्रांतीचा उत्साह आहे. त्यामुळे बाजारपेठ्यांमध्ये महिला वर्ग हळदी कुंकू वाण खरेदीसाठी गर्दी करत आहेत. अशात या तरुणाने एक मजेशीर मेसेज या पाटीवर लिहिलाय. हा मेसेज पाहून महिलांनाही हसू आवरत नाहीय. त्या तरुणाने या पाटीवर लिहिलंय की, बायकोला तिळगूळ देणे ही श्रद्धा आहे, आणि ती गोड गोड बोलेल ही अंधश्रद्धा आहे.
हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाशिकमधील आहे. सोशल मीडियावर sahil_0919 या अकाऊंटवर तो असे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचा या व्हिडीओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत असतात.