Underwater Museum in Konkan: केंद्र सरकारने कोकण आणि नाशिककरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन सुरु करण्यात येणार आहे. ️नाशिकमधील राम काल पथाचा विकास करण्यात येणार आहे.
Maharashtra tourism gets boost !
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji and efforts of Union Minister Gajendra Singh Shekhawat ji, Maharashtra gets boost to shine on global tourism map with groundbreaking projects:
Ex INS Guldar Underwater Museum, Artificial… pic.twitter.com/y5sPPUZzqW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
हे प्रकल्प, ₹3295.76 कोटी रुपयांचे असून ते SASCI योजनेचा एक भाग आहेत. यामुळे पर्यटनाला जागतिक दर्जापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार. यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालनादेखील मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे, महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर ठळक प्रकल्पांसह चमकण्यासाठी चालना मिळत असल्याचे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत 3 मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिल्याची माहितीदेखील फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे. रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त 300 ट्रेन्स जोडल्या जाणार आहेत. या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल. एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात. दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत. यात तिन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग. या तिन्ही मार्गावर लोकल धावतात.