महाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट! शार्प शूटरला सुपारी; लातूरला लग्न सोहळा सुरु असतानाच...; तपास सुरु

आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. काही लोकांनी आपली सुपारी शार्प शुटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिली आहे.

शिवराज यादव | Updated: Dec 26, 2024, 08:47 PM IST
महाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट! शार्प शूटरला सुपारी; लातूरला लग्न सोहळा सुरु असतानाच...; तपास सुरु title=

आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. काही लोकांनी आपली सुपारी शार्प शुटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिली आहे. त्यामुळे कोण किणीकरांच्या जीवावर उठलं आणि का याची उत्तर आता पोलीस तपासानंतरच मिळणार आहेत. 

कोण उठलं आमदारांच्या जीवावर?

कुणी रचला आमदाराच्या हत्येचा कट?

बालाजी किणीकरांची शार्प शूटर्सला दिली सुपारी?

अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येसाठी काही लोकांना सुपारी  दिल्याची माहितीही खुद्द किणीकर यांनी दिली आहे. 23 डिसेंबरला काही लोकांनी हत्येचा कट रचला होता. लातूरला 26 डिसेंबरला लग्न सोहळ्यासाठी जाणार असल्याची माहिती शार्प शुटरला देण्यात आली आणि त्याच दिवशी हत्या करण्याचा कट रचल्याचा दावा किणीकरांनी केला आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे तातडीनं तपास करून हत्येचा मास्टरमाईंड शोधावा अन्यथा संपूर्ण अंबरनाथ रस्त्यावर उतरेल असा इशारा किणीकरांनी दिला आहे. 

अंबरनाथला राजकीय हत्यांचा इतिहास आहे. यापूर्वी अनेक स्थानित नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. काहींच्या हत्येचा प्रयत्न झाला.  शिवसेना आमदार  बालाजी किणीकर यांच्या जीवावर कोण उठलं?. आणि त्यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली? त्यांची हत्या कुणाला आणि का घडवून आणणायची यासह इतर प्रश्नांची उतर लवकरच पोलीस शोधून काढतील यात शंका नाही. अन्यथा अंबरनाथमधील किणीकर यांच्या समर्थकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.