उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील हत्येची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांना आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि एका मित्राला अटक केली आहे. ही घटना हरदत्त नगर गिरंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंसरी गावात घडली. भेंसरी गावातील रहिवासी राजा बाबू यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राजा बाबूच्या वडिलांनी जुन्या वादातून पाच जणांवर आणि आठ अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
घटनेचा खुलासा करताना एसपी घनश्याम चौरसिया यांनी सांगितले की, मृत राजा बाबूचे लग्नापूर्वी बहराइच पोलिस ठाण्याच्या कोतवाली देहात परिसरातील नगरौर गावातील रहिवासी राणूच्या पत्नीशी अवैध संबंध होते. लग्नाच्या एका वर्षानंतरही मृत राजा बाबू आपल्या पत्नीला अश्लील फोटो आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत होता.
पाईप, साखळी आणि चाकूद्वारे राजा बाबूची हत्या
एकदा रानूने तिच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाहिले होते. यानंतर, 30 जानेवारीच्या रात्री रानूने आपल्या पत्नीला सांगून राजा बाबूला आंब्याच्या बागेत बोलवण्यास सांगितले. जिथे आधीच उपस्थित असलेल्या रानूने बहराइचच्या कोतवाली देहात परिसरातील बेरिया गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या मित्र उपेंद्र यादवसोबत मिळून लोखंडी साखळी, पाईप आणि चाकूने राजा बाबूची हत्या केली.
तिघांना पोलिसांकडून अटक
या प्रकरणात रानू, त्यांची पत्नी आणि मित्र उपेंद्र यादव यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी वापरेला चाकू, साखळी, पाईप, हे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासोबकच राजा बाबूच्या मोबाईलचे रक्ताने माखलेले कव्हर, एक मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना संबंधित न्यायालयात हजर करण्यात आले. जिथून जोडप्याला आणि त्यांच्या सहकाऱ्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.