गाडी चालवताना मांडीवर बसली होती रशियन गर्ल, तरुणाचा ताबा सुटला अन् नंतर...; पोलिसांनीही लावला डोक्याला हात

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या रशियन तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातला आणि पोलिसांचाही विरोध केला असं साक्षीदारांनी सांगितलं आहे. रशियन तरुणीचा पोलिसांसोबत वाद घालत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2025, 08:45 PM IST
गाडी चालवताना मांडीवर बसली होती रशियन गर्ल, तरुणाचा ताबा सुटला अन् नंतर...; पोलिसांनीही लावला डोक्याला हात title=

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका इंडिगो कारने दिलेल्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. भरधाव वेगात असणाऱ्या कारने एका स्कुटीला धडक दिली. या स्कुटीवरुन तीन तरुण प्रवास करत होते. जखमींना गंभीर अवस्थेत मेकाहारा रुग्णालयात दाख करण्यात आलं आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कार एक तरुण चालवत होता, ज्याच्यासोबत एक रशियन तरुणीही होती.

तेलीबांधी पोलीस स्टेशन परिसरातील व्हीआयपी चौकात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे की, अपघात झाला तेव्हा दोघेही दारुच्या नशेत होते. तरुण कार चालवत असताना रशियन तरुणी त्याच्या मांडीवर बसलेली होती. ज्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गदारोळ झाला होता. 

सांगितलं जात आहे की, मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या रशियन तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातला. तिने पोलिसांनाही विरोध केला. रशियन तरुणीचा पोलिसांसह वाद घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

पोलिसांनी वकील आणि रशियन तरुणीला ताब्यात घेतलं आहे. दोघांचीही चौकशी केली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे अपघातात जखमी झालेल्या तिन्ही तरुणींची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी जखमींच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे.