३१ जानेवारीला साई मंदिर ४ तास राहणार बंद

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साई मंदिर चार तास बंद राहणार आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 28, 2018, 01:43 PM IST
३१ जानेवारीला साई मंदिर ४ तास राहणार बंद title=

शिर्डी : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साई मंदिर चार तास बंद राहणार आहे. 

खग्राह चंद्रग्रहणामुळे ३१ जानेवारीला मंदिर बंद राहणार आहे. संध्याकाळी पाच ते रात्री 8.42 या कालावधीत साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साई संस्थाननं याबाबतची माहिती दिलीय. 

शिर्डीचे साईबाबा आणि तिरूपतीची भेट

कोपरगाव येथील साई बालाजी ट्रस्टच्या वतीने मागील दहा वर्षांपासून श्री साई बालाजी पालखी तिरूपतीला नेली जाते. यामध्ये सुमारे 1500 भाविक दरवर्षी सहभागी होतात. हे पालखी सोहळ्याचं 10वं वर्ष असून ह्यावर्षीच्या पालखीचं कोपरगाव येथून स्वतंत्र रेल्वेने तिरूपतीकडे प्रस्थान झालं. शिर्डीचे साईबाबा आणि तिरूपतीची ही भेट होणार आहे.