ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 23, 2024, 12:54 PM IST
ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'  title=
sanjay raut reaction over raj thackeray uddhav thackeray meet

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी एका लग्नसोहळ्यात भेट झाली. दोघा भावांनी एकमेकांशी संवाददेखील साधला. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं भाऊ एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे महाराष्ट्राचा ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही चर्चा अनेक वर्षा सुरू आहे त्या चर्चेत माझ्यासारखा माणूस देखील सहभागी असतो राज ठाकरे यांच्यासोबत देखील मी काम केले आहे त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहीलं आहे. उद्धव ठाकरे हे देखील माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे. महाराष्ट्राचे ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे,' असं राऊतांनी म्हटलं आहे. 

पुढे ते म्हणाले की, 'दोघांचे पक्ष वेगवेगळे राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करणे मध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे आशा व्यक्तीसोबत जाणं महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल. राज ठाकरे हे अशा लोकाची भला भल करतात,' अशी टीका राऊतांनी केली आहे. 

'एकेकाळी आम्ही देखील भाजप सोबत राहिलो आहोत. हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह पण कुटुंब एकच असतं. अजित पवार, शरद पवार, रोहित पवार हे एकत्र भेटतात ना. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असले तरीही भाऊ म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे त्यांचा एक मुलगा इकडे तर एक मुलगा तिकडे, कुटुंब एक असतं,' असंदेखील राऊतांनी म्हटलं आहे. 

'कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रवाह असतात त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा विचार महाराष्ट्रने केला पाहिजे. काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यांनी घ्यायचा त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल,' असं राऊतांनी म्हटलं आहे.