RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करत मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे आता रेपो रेट 6.50 वरुन 6.25 झाला आहे. आता बँक लवकरच कर्जावरील व्याजही कमी करण्याची घोषणा करु शकतं अशी अपेक्षा केली जात आहे. जर बँकेने व्याजदरावर कपातीची घोषणा केली तर तुमचं पर्सनल लोन, कार लोन आणि होम लोनवरील EMI कमी होईल.
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर कर्जावरील EMI कमी कसा होणार? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. खरं तर बँक कर्ज देताना व्याजदराचे दोन पर्याय देतं.
पहिला - बँक फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर ग्राहकांवर कर्ज देते. याचा अर्थ तुमचं कर्ज सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत EMI समान राहणार. मग RBI ने रेपो रेट कमी किंवा जास्त केला तरी फरक पडत नाही. फिक्स्ड इंटरेस्ट लोन घेतल्यानंतर त्यात कोणताही बदल होत नाही.
दुसरा - जर तुम्ही फ्लोटर रेटवर लोन घेतलं असलं तरी कर्जाचा हफ्ता रेपो रेटसह कमी होतो आणि वाढतो. RBI ने रेपो रेट कमी केल्यांनंतर कर्ज घेणाऱ्यांचा हफ्ता किंवा वर्षं कमी होऊ शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये बदल केल्यानंतर आता तुमच्या बँकेचे व्याजदरही बदलतील. पण त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. कर्ज घेताना जर तुम्ही (रेपो रेटमधील बदलानुसार) EMI चा पर्याय निवडला असेल तर ईएमआयमध्ये बदल होईल. पण जर तुम्ही लोनच्या मुदतीचा पर्याय निवडला असेल तर ती कमी होतील.
तथापि, जर तुम्ही मुदत बदलण्याचा पर्याय निवडला असेल आणि EMI कमी करायचा असेल, तर तुम्हाला बँकेत जावे लागेल. बँकेत जाऊन, तुम्ही तुमच्या प्रश्नानुसार ईएमआय किंवा कालावधी बदलू शकता.
जर तुम्ही आरबीआयच्या रेपो रेट कपातीनंतर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही काही दिवस वाट पहावी. जेव्हा सर्व बँका कर्जावरील व्याजदर बदलतील, तेव्हा तुम्ही सर्व बँकांच्या व्याजदरांचा आढावा घेऊ शकता आणि सर्वात कमी व्याजदर देणारे कर्ज घेऊ शकतो. तथापि, तुम्हाला हिंडन चार्जेस इत्यादींबद्दल देखील माहिती मिळायला हवी.
रेपो दरात कपात झाल्यानंतरही, जर बँक तुमच्या कर्जावरील व्याजदर कमी करत नसेल, तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकता. तथापि, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही ज्या बँकेत कर्ज हस्तांतरित करत आहात त्या बँकेला तुम्हाला जास्त व्याज आणि छुपे शुल्क द्यावे लागू नये.