पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी

Rakhi Sawant : राखी सावंतशी पाकिस्तानच्या मौलवीला करायचंय लग्न,,, 

दिक्षा पाटील | Updated: Feb 7, 2025, 03:40 PM IST
पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी title=
(Photo Credit : Social Media)

Rakhi Sawant : सोशल मीडियावर चर्चेत असणारी राखी सावंत लग्नाला घेऊन चर्चेत आहे. नुकतीच बातमी आली की पाकिस्तानी अभिनेता डोडी खाननं राखीला प्रपोज केलं होतं पण आता त्यानं लग्न करण्यास नकार दिला. आता पाकिस्तानचे एक मुफ्ती आहेत ज्यांनी राखीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे मुफ्ती पाकिस्तानच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी एक आहेत. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये राखी सावंतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबत त्यांनी सांगितलं की त्याआधी त्यांना एका व्यक्तीकडून याविषयी परवानगी घ्यायची आहे. 

मुनीजे मोईनच्या पॉडकास्टवर मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीविषयी चर्चा केली. यावेळी चर्चा करत असताना मुफ्तीला सांगितलं की राखीला कोणत्या मौलवीशी लग्न करण्याची इच्छा आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्यासाठी ते तयार आहे. मुफ्ती यांनी सांगितलं की ते राखीशी लग्न करण्यासाठी तयार आहेत, पण त्या आधी त्यांना त्यांच्या आईची परवानगी घ्यावी लागेल. त्यांनी या मुलाखती दरम्यान, लग्नाविषयी सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांचं पहिलं लग्न अशा एक महिलेसोबत झालं होतं जिचं कुटुंब हे मौलाना अब्दुल कलाम आजाद आणि गांधी जी यांना ओळखत होतं. त्यांच्या पत्नीचं वेळच्या आधीच निधन झालं. 

हेही वाचा : VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स

राखी सावंतनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की पाकिस्तानी अभिनेता डोडी खान यांना तिच्याशी लग्न करायचं आहे. डोडी यांनी राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज देखील केलं होतं. त्यानंतर डोडी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की ते लग्न करू शकत नाही. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की ते राखीला पाकिस्तानची सून बनवतील. राखी सावंतच्या लग्ना विषयी बोलायचं झालं तर ती तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. या आधी तिचं दोन वेळा लग्न झालं आहे. पण असं असलं तरी तिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झालेली नाही. त्यामुळे आता पुढे काय होतंय. राखी खरंच पाकिस्तानची सून होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.