राष्ट्रवादीच्या शिर्डीमध्ये पार पडलेल्या अधिवेशनानंतर पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांविरोधातील षडयंत्र असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिर्डीच्या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. आता पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र होतं तर कुणी रचलं?' होतं असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे..
पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं तर रचलं कुणी?
पहाटेच्या शपथविधीवरून भुजबळांचा सवाल
छगन भुजबळाचा रोख कुणाकडे?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 2019 मध्ये घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा राज्याच्या राजकारणात थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या शिर्डी अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केला आहे. पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं तर कुणी रचलं?' होतं असा सवाल छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे.
तर पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या दिवशी मविआच्या बैठकीत नेमकं काय झालं होतं त्याची इनसाईड स्टोरीही यावेळी छगन भुजबळांनी सांगितली आहे. पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री 8 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शपथविधी झाल्यानंतरच हा प्रकार आपल्याला समजल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. तर मी भुतकाळात रमत नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं आहे.
पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं फसलेलं एक बंड होतं अशी राजकीय इतिहासात नोंद आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी गौफ्यस्फोट करत हे अजितदादांच्या विरोधातलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. मात्र भुजबळांनी षडयंत्र कुणी रचलं असा प्रश्न उपस्थित केल्यानं भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे.