बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला...'

Ajit Pawar on Beed Guardin Minister: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 05:52 PM IST
बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला...' title=

Ajit Pawar on Beed Guardin Minister: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी होत आहे. मात्र अद्याप पालकमंत्रीपदासंबंधी अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र आता 19 जानेवारीच्या आधी पालकमंत्रीपदाबाबत निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 

"एक महिना उलटून गेला असल्याने कुटुंब चिंतेत आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. सीआयडी, एसआयटी तपास करत आहे. न्यायाधीशांच्या मार्फतही चौकशी केली जात आहे. दोषींना थारा द्यायचा नाही अशी भूमिका आहे. ही निर्घृण हत्या आहे. कोणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे, चौकशीत मिळाले तर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे प्रमुख आणि एकनाथ शिंदे यांनीही हे संगितलं आहे. ही अतिशत निर्घृणण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे," असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

"कोणालाही थारा दिला जाणार नाही. चांगले एसपी पाठवले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे वाटेल ते करण्याचा अधिकार त्यांना दिला आहे," असंही ते म्हणाले. दरम्यान बीडतं पालकमंत्रीपद घेणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, 'पालकमंत्रीपद विभागाचं वाटप हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. निवडणुका झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रीपदासाठी वेळ लागला हे खरं आहे. उद्या पंतप्रधान येणार आहेत. उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत, सर्व आमदारांना ते भेटणार आहेत. मुख्यमंत्री दिवसभर व्यग्र असतील. त्यात 19 तारखेला दावोसला जाणार आहेत, त्याच्या आधी पालतमंत्रीपदाच्या जाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील". 

वाल्मिकला पोलीस कोठडी का दिली नाही? वकिलाने सांगितलं कारण, म्हणाले 'पुन्हा तेच 10 मुद्दे...'

 

जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहेत असं ते म्हणाले. 

हार्वेस्टर अनुदानात घोटाळ्यात धनंजय मुडे यांच्या जवळच्या वाल्मिक कराडने शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असल्याच्या आरोपाविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "जे आरोप झाले आहेत त्याची चौकशी केली जाईल आणि दोषीवर कारवाई केली जाईल. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही जात, पातीचा विचार केलेला नाही. प्रत्येकाने आपली जाबबदारी पार पाडली पाहिजे. अजून तपास सुरु आहे. जर लाच द्यावी लागली असेल तर पुरावा द्या आणि चौकशी करु आणि दोषींना शासन करु".