MHADA Konkan Lottery 2024 Results Date: मुंबई, ठाणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी अनेक नागरिक म्हाडाच्या घरांवर अवलंबून असतात. म्हाडाची घर तुलनेने स्वस्त असल्यामुळं ती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये व परवडणाऱ्या दरांमध्ये येतात. अलीकडेच मुंबई मंडळाची लॉटरी निघाली होती. त्यानंतर कोकण मंडळानेही म्हाडाच्या 2264 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीची बुधवारी सोडत काढली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोडतीत 24 हजार 911 पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. ९० टक्क्यांहून अधिक अर्थात २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत.
11 ऑक्टोबर 2024 मध्ये 2147 घरांसाठी आणि 110 भुखंडांसाठी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर कोकण मंडळाने दोनदा अर्ज स्वीकृतीची वेळ आणि तारीख वाढवली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 6 जानेवारी होती. त्यानंतर बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी 2,147 घरांसाठी 110 भूखंडासाठी सोडत निघणार आहे.
2,417 घरांसाठी 110 भूखंडांसाठी सोडत निघणार असून संपूर्ण प्रक्रिया ही संगणककृत असणार आहे. जिथून दुपारी 1 वाजता लकी ड्रॉ घोषित होणार आहे. लकी ड्रॉ घोषित झाल्यानंतर अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://housing.mhada.gov.in/) जाऊन त्यांचे नाव तपासून पाहू शकणार आहेत. वेबसाइटवर जाऊन त्यांना अॅप्लीकेशन नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की लकी ड्रॉसाठी तुमचं नाव लागलं आहे की नाही.
म्हाडा कोकण लॉटरीमध्ये ज्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, ओरस, वेंगुर्ला आणि मालवण सारख्या प्रमुख ठिकाणी बांधण्यात आले आहेत.