'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...'

छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाच्या सेटवर आपण औरंगजेबाची (Mughal Shahenshah Aurangzeb) भूमिका निभावणाऱ्या अक्षय खन्नासह (Akshay Khanna) अजिबात बोलत नव्हतो असा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2025, 03:46 PM IST
'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...' title=

'छावा' (Chhava) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटप्रेमींना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) लेझीम खेळताना दाखवल्याने वादही निर्माण झाला. अखेर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी हे दृश्य हटवणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) हा चित्रपट फार यशस्वी होईल आणि आपल्या करिअरला वळण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान या चित्रपटात विकी कौशलसह रश्मिका मंधाना महाराणी येसूबाई आणि अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका निभावताना दिसणार आहे. 

लक्ष्मण उतेकर यांनी अक्षय खन्नाचं कौतुक केलं असून, बॉलिवूडमध्ये सध्या असणाऱ्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाला फारसं पाहण्याची संधी मिळाली नसली तरी, लक्ष्मण उतेकर यांनी त्याने निभावलेला औरंगजेब कमाल असल्याचं म्हटलं आहे. "त्याने ज्याप्रकारे औरंगजेब निभावला आहे, ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल," असं लक्ष्मण उतेकरांनी बॉलिवूड हंगमाशी संवाद साधताना म्हटलं. तो फार कमी बोलतो, मात्र डोळ्यांच्या माध्यमातून फार संवाद साधतो असं त्यांनी सांगितलं आहे. 

अक्षय कुमार फार मोजके चित्रपट करत असल्याने त्याला या भूमिकेसाठी कसं तयार केलं? असं विचारण्यात आलं असता लक्ष्मण उतेकर यांनी आपण अभिनेत्याच्या अलिबागमधील घरी गेलो इतकंच गरजेचं होतं असं सांगितलं. "तो फार छान व्यक्ती आहे. तो फार मोजके प्रोजेक्ट करतो, पण जे करतो ते मनापासून करतो," असं ते म्हणाले.

दरम्यान अक्षयसोबत आपल्या काम करण्याच्या अनुभवावर विकी कौशल म्हणाला की, "औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी नऊ वर्षं लागली. त्यामुळे, चित्रपटाचा बराचसा भाग त्याचा शोधण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना दाखवतो. काही क्षण एकत्र (विकी आणि अक्षय यांच्यात) आहेत, परंतु चित्रपट त्यांच्या (एकमेकांना भेटण्यासाठी) भेटीबद्दल असून, तुम्हाला त्या भेटीची वाट पाहावी लागेल. औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेत त्याने आणलेला मूक कृशता आणि धूर्तपणा छत्रपती संभाजी महाराजांच्या गर्जनेत सुंदरपणे मिसळला आहे."

गंभीर सीन शूट करण्याआधी दोन्ही अभिनेते एकमेकांना भेटत नव्हते याबद्दल लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं की, "ज्या दिवशी दोघांचा सीन शूट होणार होता, त्याच दिवशी ते पहिल्यांदा भूमिकेच्या पोषाखात एकमेकांना भेटले होते". विकीने यावेळी आपण शूटच्या आधी वैयक्तिक संवाद साधला नसल्याचं सांगितलं. "आम्ही ज्या दिवशी सीन शूट करणार होते, त्या दिवशी गुड मॉर्निंग, गुडबाय किंवा हॅलो म्हटलं नाही. तो ओरंगजेब आणि मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याने थेट शुटिंगला गेलो. अक्षय खन्ना आणि विकी कौशल म्हणून आम्ही काहीच बोललो नाही".