Navpancham Yoga: 559 वर्षांनी 7 नवपंचम राजयोग! ‘या’ लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ; करियरमध्ये प्रगतीसह अमाप संपत्ती

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रहांचा या स्थिती बदलचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो. लवकर तब्बल 559 वर्षांनी 7 नवपंचम योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Feb 4, 2025, 02:39 PM IST
Navpancham Yoga: 559 वर्षांनी 7 नवपंचम राजयोग! ‘या’ लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ; करियरमध्ये प्रगतीसह अमाप संपत्ती title=

Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदल असतो. एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक योग आणि राजयोग निर्माण होत असतात. या योगांचा मानवी जीवना सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. यावर्षी तब्बल 559 वर्षांनंतर 7 नवपंचम योग निर्माण होणार आहे. ज्यामध्ये गुरु-केतू, मंगळ-शनि, मंगळ-शुक्र, बुध-गुरू, चंद्र आणि राहू एकत्रितपणे शुभ योगाची निर्मिती करणार आहे. ज्यामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होणार असून या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्येही उंच शिखर गाठता येणार आहे. 

मेष रास

या राशीचा स्वामी मंगळ तुमच्या गोचर कुंडलीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे 7 नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसंच, शनि आणि शुक्रासह नवपंचम योग तयार होत आहे. म्हणून, यावेळी, पैशाच्या बाबतीत वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळणार असून तुम्ही नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवू करणार आहात. खर्च नियंत्रणात राहतील आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखणार आहात. पण यावेळी तुम्ही तुमच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवा. 

कर्क रास

7 व्या नवपंचम योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढणार आहे. तसंच तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय व्हाल. यावेळी तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. तसंच व्यवसाय करणाऱ्यांना बाजारात आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत विकसित होतील. शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळू शकतो. यावेळी तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तसंच, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहे. 

मकर रास 

या राशीच्या लोकांसाठी सात नवपंचम योगांची निर्मिती शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळणार आहे. तसंच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवणार आहात. खर्च नियंत्रणात राहणार असून तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याची योजना करणार आहे. यावेळी, तुम्ही काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तसंच या काळात तुम्ही कामाशी संबंधित सहलीला जाण्याचे संकेत आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)