Mahavitaran New Electric Meter: महावितरण कंपनीने आता आपल्या राज्यातील वीज ग्राहकांना प्रीपेड वीज मीटरच्या जागी नवीन असे टीओडी वीज मीटर बसवून देण्याची सुरूवात केली आहे. स्मार्ट मीटरचा विषय मागे पडल्यानंतर आता या वीज मीटरचा अत्यंत आधुनिक प्रकार महावितरणाकडून अंमलात आहे. नेमके टिओडी वीज मीटर काय आहेत आणि हे राज्यात का बसवले जात आहेत पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून..
महाराष्ट्रात महावितरण कंपनीने नेहमीच्या मीटरच्या जागी टीओडी मीटर बसविण्याची सुरुवात केली आहे. जुने मीटर प्रीपेड मीटर किंवा सदोष नादुरुस्त मीटरच्या जागी आणि नवीन वीज जोडणीमध्ये टीओडी मीटर लावण्यास राज्यामध्ये सुरुवात झाली आहे. टीओडी मीटर अर्थातच 'टाईम ऑफ डे' मीटर लावण्यात येत आहे. सध्या नवीन मीटर हवे असलेल्या ग्राहकांना आणि तक्रारी असलेल्या ग्राहकांना हे मीटर दिले जात आहेत. मात्र यामध्ये अनेक अनिर्बंध बिल ही उद्योगांना आणि विविध संस्थांना येत असल्याने या मीटरबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना हे डिजिटल वीज मीटर मोफत बसवून देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.
> या मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांना आता दिवस आणि रात्र वापराचे युनिट्स अशी वेगवेगळी मोजमाप करून बिल मिळणार आहेत.
> सोलर पावर प्रकल्पांसाठी नेट मीटर सिस्टम आणि अचूक मीटर रिडींग या सर्वांची माहिती वीज ग्राहकांना टीओडी मीटरमुळे मिळेल.
> टीओडी मीटर लावल्यानंतर वीज वापर, युनिट खर्च, मीटर रीडिंग हे महावितरणकडून उपलब्ध करण्यात येत असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून थेट पाहता येणार आहे.
> अगदी काही मिनिटांमध्ये वीज ग्राहकांना आपल्या टीओडी मीटरमध्ये किती युनिट वीज वापरण्यात आली आणि किती रीडिंग झाली याची माहिती कळेल.
औद्योगिक वापरासाठी टीओडी मीटरचा वापर यापूर्वीच सुरू झाला आहे. रात्रीच्या सुमारास इंडस्ट्रीला वीज दरात 2 रुपयांनी सूट दिली आहे. घरगुती वापरात रात्री जास्त वापर केला . मात्र औद्योगिक वापराच्या नेमके उलटे घरगुतीमध्ये रात्री मात्र जास्त रेट आहे, त्याला ग्राहक मंचाचा विरोध आहे. स्मार्ट मीटरचा अत्याधुनिक रूप असलेल्या या मीटरमध्ये घरगुती वीज दरात देखील रात्रीच्या वेळी 2 रुपये कपात करावी, अशी मागणी ग्राहक मंचाचे सचिव विलास देवळे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यात अनेक भागात 300 युनिट पेक्षा जास्त असल्यास 12 ते 13 रुपये येऊन पर युनिट असा दर आहे. असे दर लावून मोनोपोली अॅक्ट नुसार वीज मंडळाने देखील पोर्टेबिलिटी द्यावी घरगुती मीटरला खुलं करावं असं देखील ग्राहक मंचाच्या सेक्रेटरी यांनी मागणी केली आहे.
या मीटरच्या बाबतीमध्ये सध्या संपूर्ण वीज मंडळामध्ये ऑन कॅमेरा बोलण्यास मौन धारण करण्यात आले. याबाबत वीज नियम आयोगात याबाबत सुनावणी चालली असल्याने यावर प्रतिक्रिया देता येणार नाही असे सांगितलं जातेय. मात्र या लपवाछपवीमुळे टीओडी वीज मीटर बाबत शाशंकता निर्माण होत आहे.