Maharashtra Weather Alert: ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पहिल्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत मध्य स्वरुपाचा पाऊस बरसला आहे. पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस बरसणार आहे.
पुणे आणि सातारा परिसरात घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. बाष्पयुक्त वारे वेगाने किनारपट्टीवर येत आहे. त्यामुळं किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा आणि पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर आज मुसळधार व तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
खडकवासला धरणातून 21142 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिला पाच ऑगस्टपर्यंत अलर्ट दिला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 90 टक्के भरले आहे.
राज्यात ४४५ मिमि एवढ्या पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मात्र यंदा ४५३ मिमि पावसाची नोंद झाली आहे. सरासरीत १.८ टक्के इतकी वाढ झाली आहे. येत्या दोन महिन्यात खान्देश ,मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. तर कोकण , मध्य महाराष्ट्रात पाऊस सरासरी एवढा राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.