Maharashtra Weather : राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता -IMD

Weather Update : आज महाराष्ट्रातील उत्तर भागात, कोकण आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्याचा परिणाम वातावरणावर आणि पर्यायाने आरोग्यावर होत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 11, 2025, 07:43 AM IST
Maharashtra Weather : राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता -IMD  title=

गेल्या काही दिवसांपासून हवामान सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात सतत बदल होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे हलक्या आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. 

आज मुंबईकरांना धुक्याच्या थराने जाग आली. 11 जानेवारी 2025 रोजी मुंबईसाठी येथे काही माहिती आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, शहराचे कमाल तापमान 31.0 अंश राहील, तर थंडीच्या काळात ते 24.0 अंशांपर्यंत घसरेल. आज शहराची हवेची गुणवत्ता AQI स्केलवर 153 आहे. सकाळी काही प्रमाणात धुके किंवा धुके पडण्याची शक्यता आहे, तर दुपारी अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. आजच्या हवामान, मुंबईतील सध्याचे तापमान आणि येत्या आठवड्यातील हवामान बदल पाहायला मिळेल. 

थंडी वाढण्याचं कारण काय?

नैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने IMD सांगितले की, आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.

उकाड्यातही वाढ 

 मुंबईकरांना शुक्रवारी असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. तापमानाचा पारा कमी असतानाही पारा चढा असल्यासारखे वाटत होते.  एक- दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी 30 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापमान सरासरी इतकेच असतानाही वाढलेल्या आर्द्रतेमुळे शुक्रवारी उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली होती.

राज्यात काही भागात शनिवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.