" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा

Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 11, 2025, 11:34 AM IST
" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा title=

Robin uthappa shocking claim : 2007चा T20 विश्वचषक जिंकण्यात मोठा वाटा असलेला खेळाडू म्हणजे रॉबिन उथप्पा. रॉबिन उथप्पाची वेगवान खेळी आणि पाकिस्तानविरुद्धचा बॉल आऊट सामना जिंकण्यात क्वचितच कोणीही विसरू शकेल.  पण अलीकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने  युवराज सिंगच्या निवृत्तीचे कारण सांगितले.यासोबतच त्याने क्रिकेट खेळात क्रिकेटपटूंना कोणत्या मानसिक स्थितीचा सामना करावा लागतो यावरही भर दिला. रॉबिन उथप्पाने असा दावा केला आहे की, संपूर्ण जगात कोणत्याही खेळात सर्वाधिक आत्महत्या होत असतील तर ते क्रिकेट आहे. तर त्याने असेही वक्तव्य केले आहे की, क्रिकेटरवर इतका दबाव असतो की त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि तो डिप्रेशनमध्ये जातो.  

नक्की काय म्हणाला रॉबिन उथप्पा?

रॉबिनने नुकतेच लल्लन टॉपला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींवर भर दिला. त्याने सांगितले की, " क्रिकेट या खेळात केवळ खेळाडूंनाच नाही तर पंच आणि प्रसारकांनाही मानसिक ताण आणि दबावाचा सामना करावा लागतो. क्रिकेट हा सांघिक खेळ असूनही, त्यात अनेक वैयक्तिक संघर्षांचाही समावेश असतो, जिथे खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. खूप कमी लोकांना माहित आहे की सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात." 

हे ही वाचा: प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?

 

पुढे तो म्हणाला की, " या खेळातील स्पर्धेची पातळी एवढी जास्त आहे की, बेंचवर बसलेल्या इतर खेळाडूंच्या तुलनेत खेळाडूंना नेहमीच त्यांच्या जागेची चिंता असते. 10-15 वर्षे या तणावात आणि भीतीत खेळून, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जाते आणि अंधारात जाते, ज्यामुळे शेवटी मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात." 

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट

 

 

हे ही वाचा: धनश्री- चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आणखी एका खेळाडूचं नातं तुटणार? सोशल मीडियावर समोर आले सत्य

'मला माझीच लाज वाटत होती'

2011 मधील आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, "मला 2011 मध्ये  स्वतःची लाज वाटत होती.  एक व्यक्ती म्हणून मी काय झालो याची मला लाज वाटू लागली होती." त्यावेळी तो नैराश्याशी झुंजत होता आणि आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचला होता. या कठीण काळात, त्यांना असे वाटले की तो त्यांच्या प्रियजनांवर ओझे बनला आहे आणि स्वतःचा काहीच उपयोग होत नाहीये.